Job opportunity : जर तुमच्या मुलांना 'या' कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तर सैन्यदलात अधिकारी म्हणून नोकरी पक्की, असं घ्या ॲडमिशन

Last Updated:

महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असंत की, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगली नोकरी मिळावी. त्यासाठी विद्यार्थी आपल्या महाविद्यालयीन काळात प्रचंड मेहनत करतात.

News18
News18
Indian Army AFMC Admission 2024 : महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असंत की, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगली नोकरी मिळावी. त्यासाठी विद्यार्थी आपल्या महाविद्यालयीन काळात प्रचंड मेहनत करतात. चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थी दहावीपासूनच तयारी करत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महाविद्यालयाची माहिती सांगणार आहोत. ज्याचं नाव आहे आर्म्ड फोर्सेज मेडिकल कॉलेज (AFMC). या महाविद्यालयात जो विद्यार्थी प्रवेश मिळवण्यात यशस्वी होतो. त्याला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय सैन्यदलात नोकरी मिळण्याची सर्वाधिक संधी असते. तो भारती सैन्य दलामध्ये मेडिकल ऑफिसर होऊ शकतो. जर तुम्हालाही भारतीय सैन्यदलात भरती होण्याची इच्छा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगाची ठरू शकते.
या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी काही अटी आहेत. या कॉलेजमध्ये एकूण 130 जागा आहेत. ज्यामध्ये 105 जागा या मुलांसाठी तर 25 जागा या मुलींसाठी आहेत. या महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला नीट परीक्षा पास होणं गरजेचं आहे. सोबतच तुमच्याकडे भारत, नेपाळ किंवा भूटान या तीन देशांपैकी एका देशाचं नागरिकत्व आवश्यक आहे. तुम्ही अविवाहीत असणं गरजेचं आहे, तुमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तुम्हाला लग्नाची परवानगी मिळत नाही. तसेच सैन्य दलात भरती होण्यासाठी जे काही फिटनेस संदर्भात नियम बनवण्यात आले आहेत. त्या सर्व नियमांची पूर्तता होणं गरजेचं आहे.
advertisement
तुम्हाला जर या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर तुम्ही विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा उतीर्ण होणं गरजेचं आहे. इंग्रजी, फिजिक्स, केमेस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय अनिर्वाय आहेत. हे सर्व विषय मिळून तुम्हाला जर बारावीत साठ टक्क्यांपेक्षा अधिक गूण असतील तरच तुम्हाला या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो. या सोबतच इंग्रजी विषयात कमीत कमी पन्नास टक्के गुण आवश्यक आहेत.
मराठी बातम्या/करिअर/
Job opportunity : जर तुमच्या मुलांना 'या' कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तर सैन्यदलात अधिकारी म्हणून नोकरी पक्की, असं घ्या ॲडमिशन
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement