Indian Navy Vacancy 2024: आठवी ते दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
फिटरसाठी50पदं,मेकॅनिकसाठी35पदं,इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी26पदं,शिपराइट, कुठे आणि कसा करायचा अर्ज किती असेल पगार वाचा एका क्लिकवर
देशाची सेवा करणं हे अनेकांचे स्वप्न असतं. अनेक तरुण भारतीय सैन्यात,नौदलात किंवा हवाई दलात भरती होण्याची स्वप्नं पाहतात आणि मेहनत करून स्वप्न पूर्णही करतात. अशाच तरुणांसाठी नौदलात काम करण्याची एक चांगली संधी आहे. भारतीय नौदलाने सुमारे300अॅप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख10मे आहे. यानंतर इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार नाहीत.indiannavy.nic.inया अधिकृत वेबसाईटला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात.24एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. रिक्त जागा,पदं,व वयोमर्यादा याबाबत जाणून घेऊयात.
advertisement
कोणत्या पदासाठी किती जागा?
फिटरसाठी50पदं,मेकॅनिकसाठी35पदं,इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी26पदं,शिपराइट मुलींसाठी18पदं,वेल्डरसाठी15पदं,मशिनिस्टसाठी13पदं,एमएमटीएमसाठी13पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासोबतच पाईप फिटरसाठी13पदं,पेंटरसाठी नऊ पदं,इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकसाठी सात पदं,शीट मेटल वर्करसाठी तीन पदं,टेलर (जी) तीन पदं,पॅटर्न मेकरसाठी दोन पदं आणि फाउंड्रीमनसाठी एक पद रिक्त आहे. या सर्व रिक्त जागा भरल्या जातीलच,पण इतरही काही रिक्त जागा आहेत,ज्यावर भरती केली जाणार आहे. त्या पदांबद्दल माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत नोटिफिकेशन तपासू शकता.
advertisement
पगार किती मिळणार?
या नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यासाठी,नॉन-आयटीआय ट्रेडसाठी आठवी पास आणि फोर्जर हीट ट्रीटरसाठी10वी पास असणं अनिवार्य आहे. निवड प्रक्रियेत सर्वात आधी लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षा पास झालेल्या अर्जदारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. या मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल. फायनल सिलेक्शन झालेल्या उमेदवारांना दरमहा7700ते8050स्टायपँड म्हणून मिळतील.
अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती
advertisement
या पदांसाठी तर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय14ते18वर्षादरम्यान असावं. यासोबत प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराची उंची150सेमी पेक्षा कमी आणि वजन45किलो पेक्षा कमी नसावं. तसेच उमेदवाराची छाती फुलवल्यानंतर पाच सेंटिमीटरपेक्षा कमी नसावी. या शिवाय6/6ते6/9असायला हवी.
keywords -
Link -https://www.tv9hindi.com/ education/indian-navy-vacancy- 2024-sarkari-naukri-2024-for- 8th-10th-pass-know-how-can- apply-for-300-jobs-2571984. html
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 06, 2024 8:22 AM IST