Job Opportunity: नोकरीची संधी सोडू नका! एसटी महामंडळात मेगा भरती, लगेच करा अर्ज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
ST Recruitment: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर असून एसटी महामंडळात 263 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
नाशिक: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी आहे. एसटी महामंडळात 263 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025 पर्यंत आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव
मेकॅनिक मोटार व्हेईकल – 55 पदे
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर- 60 पदे
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल -30 पदे
वेल्डर -20 पदे
पेंटर -06 पदे
डीझेल मेकॅनिक -70 पदे
रेफ्रिजरेटर अँण्ड एअर कंडीशनर -10 पदे
इलेक्ट्रोनिक्स- 10 पदे
अभियांत्रिकी पदवीधर- 02 पदे
advertisement
पात्रता काय?
16 ते 33 वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. मेकॅनिक मोटर व्हेईकल पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनियरिंग किंवा डिप्लोमासाठी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडनध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. इलेक्ट्रॉनिक्स, शीट मेटल वर्कर, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक, पेंटर, वेल्डर पदासाठी उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेले असावे.
advertisement
असा करा अर्ज
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी www.mhrdnts.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी तुम्ही 3 मार्च 2025 पर्यंत अर्ज करु शकता.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
February 27, 2025 12:08 PM IST