Career Tips: तुमच्या ऑफिसमधील वर्क कल्चर टॉक्सिक तर नाही ना? हे 10 संकेतांवरुन घ्या समजून
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
करिअरमध्ये प्रगती व्हावी आणि जीवन सुखकर व्हावे, यासाठी प्रत्येकजण काम करीत असतो. पण एखादी व्यक्ती ज्या ऑफिसमध्ये नोकरी करीत आहे, ती नोकरीच त्याच्या जीवाची शत्रू बनली तर, सर्वकाही उद्ध्वस्त होतं.
मुंबई : प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या करिअरची ग्रोथ व्हावी, यासाठी प्रयत्न करीत असते. प्रत्येकजण आपापल्या परीने ऑफिसमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यानंतरही तुम्हाला प्रमोशन मिळत नसेल किंवा तुमच्या करिअरची अपेक्षेप्रमाणे ग्रोथ होत नसेल, तर तुमच्या ऑफिसमध्ये टॉक्सिक वर्क कल्चर तर नाही ना? याचा एकदा नक्की विचार करा. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारची अनेक प्रकरणं केवळ भारतातच नाही तर जगभरात समोर आलीत. यामध्ये जास्त काम व ऑफिसमधील खराब वातावरण यामुळे अनेक तरुणांनी स्वतःचा जीव गमवला आहे. यातील बहुतांश प्रकरणांमध्ये, टॉक्सिक वर्क कल्चर महत्त्वाचं कारण होतं.
करिअरमध्ये प्रगती व्हावी आणि जीवन सुखकर व्हावे, यासाठी प्रत्येकजण काम करीत असतो. पण एखादी व्यक्ती ज्या ऑफिसमध्ये नोकरी करीत आहे, ती नोकरीच त्याच्या जीवाची शत्रू बनली तर, सर्वकाही उद्ध्वस्त होतं. ऑफिसमध्ये 9 ते 10 तास घालवून निराश होऊन घरी परतणारे, चांगले काम करुनही कौतुक किंवा पदोन्नतीपासून वंचित राहणारे, अशा व्यक्तींना दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिसला जावसं वाटत नाही. अशा परिस्थितीत त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या वर्क कल्चरचा विचार करण्याची गरज आहे. दुसरीकडे ऑफिस हे कर्मचाऱ्यांसाठी आनंदी कामाचे ठिकाण व्हावे, यासाठी मॅनेजमेंटनं काम करणं महत्त्वाचे आहे.
advertisement
तुमच्या ऑफिसमध्ये टॉक्सिक वर्क कल्चर आहे की नाही, हे कसं ओळखावं?
आजची पिढी शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याकडेही तितकंच लक्ष देते. त्यामुळेच दिवसातील जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये किंवा तिथल्या कामात घालवणाऱ्यांसाठी वर्क कल्चर खूप महत्त्वाचं असतं. चला तर, आज आम्ही तुम्हाला अशा दहा गोष्टी सांगणार आहोत, ज्यावरून तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये वर्क कल्चर कसे आहे? तेथील वातावरण कसं आहे? हे समजू शकता.
advertisement
कर्मचाऱ्यांचा मूड
तुमच्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा मूड खराब राहत असेल, ते असमाधानी आणि उदासीन असतील, तर हे टॉक्सिक वर्क कल्चरचं लक्षण आहे.
संवादाचा अभाव
ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांचे विचार, मत व्यक्त करण्याची संधी मिळत नसेल, तर ते टॉक्सिक वर्क कल्चरचं लक्षण असू शकतं.
नोकरी बदलणं
तुमच्या ऑफिसमधील कर्मचारी लवकर नोकरी सोडत असतील, ऑफिसमध्ये काम करण्यासाठी इतरांची शिफारस करीत नसतील, तर मॅनेजमेंटनं सतर्क होणे गरजेचं आहे.
advertisement
कर्मचाऱ्यांना अयोग्य वागणूक
ज्या ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव केला जातो, कर्मचाऱ्यांचा अपमान केला जातो, छळ केला जातो, त्यांना अन्यायकारक वागणूक दिली जाते, तेथील कर्मचारी बऱ्याचदा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.
निर्णयात स्पष्टता नसणे
ऑफिसमध्ये मॅनेजमेंटकडून एखादा निर्णय घेण्यास होणारा विलंब किंवा धोरणं आणि कार्यपद्धतीतील अस्पष्टता, हेही टॉक्सिक वर्क कल्चरचं लक्षण आहे.
advertisement
कर्मचाऱ्यांची काळजी न घेणे
बहुतांश कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली जाते. जर तुमच्या ऑफिसमध्ये अशा पद्धतीनं काळजी घेतली जात नसेल, तर वेळीच सावध व्हा.
कामाचे जास्त तास
कर्मचाऱ्यांनी दीर्घ व अवाजवी तास काम करावे, असे अपेक्षित असेल तर ते टॉक्सिक वर्क कल्चरचं लक्षण आहे.
पारदर्शकतेचा अभाव
चांगले आणि सकारात्मक वातावरण असलेल्या ऑफिसमध्ये प्रत्येक स्तरावर पारदर्शकता असते. तुमच्या ऑफिसमध्ये पारदर्शकतेचा अभाव असेल तर वेळीच सावध व्हा.
advertisement
नेतृत्वाचा अभाव
ऑफिसमध्ये नेतृत्वाचा अभाव असेल तर ते टॉक्सिक वर्क कल्चरचं लक्षण आहे.
कर्मचाऱ्यांच्या फीडबॅककडे दुर्लक्ष करणे
view commentsकर्मचाऱ्यांच्या फीडबॅककडे सातत्यानं दुर्लक्ष केलं जात असेल, तर त्या ऑफिसमध्ये टॉक्सिक वर्क कल्चर आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2024 4:51 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Career Tips: तुमच्या ऑफिसमधील वर्क कल्चर टॉक्सिक तर नाही ना? हे 10 संकेतांवरुन घ्या समजून


