Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, KDMC मध्ये 30 वर्षानंतर मेगाभरती, पाहा संपूर्ण माहिती

Last Updated:

KDMC Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल 30 वर्षांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत मेगाभरती होणार आहे.

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, KDMC मध्ये 30 वर्षानंतर मेगाभरती, पाहा संपूर्ण माहिती
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, KDMC मध्ये 30 वर्षानंतर मेगाभरती, पाहा संपूर्ण माहिती
कल्याण: नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक खूशखबर आहे. सुमारे 3 हजार कोटींची उलाढाल असणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत तब्बल 30 वर्षांनी मेगाभरती होत आहे. गेल्या काही काळात अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून पदे रिक्त असल्याने प्रशासनाची ओढाताण होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तब्बल 1,076 जागांची महानोकरभरती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नव्या आकृती बंधानुसार 2021 मध्ये 757 जागांच्या भरतीस मंजुरी देण्यात आली होती. मात्र, गेल्या 4 वर्षांत 300 हून अधिक कर्मचारी निवृत्त झाले आहे. त्यामुळे आता विविध पदांसाठी 1076 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे सन 1995 नंतर होणारी ही पहिलीच मेगाभरती असून टीसीएस कंपनीच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबण्यात येईल. याबाबत पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली.
advertisement
कल्याण डोंबिवली महापालिकेत 1995 मध्ये शेवटची नोकरभरती करण्यात आली होती. यानंतर पालिकेत काही जागांवर अनुकंपा तत्त्वावर कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. तर आकृतीबंध मंजूर झाल्यानतंर अनेक वर्षांपासून पालिकेत काम करणाऱ्यांना पदोन्नती देत काही रिक्त जागा भरण्यात आल्या. मात्र, तरीही पालिकेत कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. तांत्रिक कर्मचाऱ्यांपासून आरोग्य विभागातील डॉक्टर, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी, लिपीक आदी पदांच्या निम्म्याहून अधिक पदांवर कर्मचारीच नाहीत. त्यामुळे प्रशासनाचा गाडा हाकताना दमछाक होत असून नोकरभरतीची मागणी होत होती.
advertisement
दरम्यान, शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेक उमेदावरांसाठी  ही एक सुवर्णसंधी असणार आहे. याबाबत लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार असून टीसीएस मार्फत पारदर्शीपणे भरती होणार असल्याचं सांगितलं जातंय. भरतीची माहिती, उपलब्ध जागा, ऑनलाईन अर्ज याबाबत माहिती पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे. तर अनेक दिवसांपासून भरती न झाल्याने घोडबाजार रंगण्याची भीती देखील व्यक्त होतेय.
advertisement
आमिषाला बळी पडू नका
कल्याण-डोंबिवली महापालिकेत नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध होताच, नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडले जाऊ शकते. मात्र, ही भरती ऑनलाईन पद्धतीने निकष तपासूनच केली जाणार असून तरुणांनी रितसर अर्ज करून मुलाखत, लेखी परीक्षेला सामोरे जावे. कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. अन्यथा फसवणूक होऊ शकते, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मराठी बातम्या/करिअर/
Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, KDMC मध्ये 30 वर्षानंतर मेगाभरती, पाहा संपूर्ण माहिती
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement