आई-वडिलांचं स्वप्न केलं साकार, सुश्रुता होणार डॉक्टर, NEET परीक्षेत 720 पैकी 701 गुण
- Published by:News18 Marathi
- Reported by:Piyush Patil
Last Updated:
कल्याणमधील सुश्रुता पाटीलने नीट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे तिचे एमबीबीएस डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
पियुष पाटील,प्रतिनिधी
कल्याण : वैद्यकीय प्रवेशासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी नीट परीक्षेला बसतात. डॉक्टर व्हायची स्वप्न डोळ्यात साठवून विद्यार्थी जीवाच रान करतात. निकालाचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी घेतलेल्या मेहनतीच फळ देणारा असतो. या वर्षी तब्बल 24 लाख विद्यार्थी हे नीटच्या परीक्षेला बसले होते. या 24 लाख विद्यार्थ्यांमधून कल्याणमधील सुश्रुता पाटीलने नीट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे तिचे एमबीबीएस डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
advertisement
पहिल्याच प्रयत्नात नीट पास
सुश्रुता पाटील ही कल्याण जवळील म्हारळ गावातील आहे. तिने नीट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात 720 पैकी 701 गुण मिळवले आहेत. त्यामुळे ती एमबीबीएसाठी पात्र झाली आहे. सुश्रुता सांगते की, माझ्या घरात आई- बाबा डॉक्टर असल्याने मला देखील लहानपणापासून डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. आई-बाबांना पण वाटायचं की मी डॉक्टर व्हावे.
advertisement
पहिल्या प्रयत्नात अपयश, पण शेतकरी बापानं दिलं बळ, अखेर त्यानं करुन दाखवलं, तरुणाची प्रेरणादायी गोष्ट
लहानपणापासून आई- बाबांना बघतं आलीय. त्यामुळे रुग्णसेवेच्या माध्यमातून मी माझं देशासाठीचं योगदान समजते. चित्रकलेची आवड असल्याने अभ्यासातून वेळ काढत मी छंद जोपासला. अभ्यासाचा तणाव जाणवू लागला की मित्र- मैत्रिणी, आई बाबांशी संवाद साधायची. तारक मेहता, हास्यजत्रा या मालिका परीक्षेच्या काळात देखील नचुकता पहिल्या, असं ती आवर्जून सांगते.
advertisement
पोरीनं नाव काढलं! झोपडपट्टीत राहणाऱ्या अल्फियाचं यश, भाजी विक्रेत्याची मुलगी होणार डॉक्टर
view commentsसुश्रुता लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार होती. नीटचा कठीण अभ्यास देखील खूप कठीण असतो, पण तिने मनाशी खुण गाठ बांधली की ती ते करतेचं, असे लेकीचं कौतुक करतांना सुश्रुताचे बाबा म्हणाले.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
June 08, 2024 11:40 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
आई-वडिलांचं स्वप्न केलं साकार, सुश्रुता होणार डॉक्टर, NEET परीक्षेत 720 पैकी 701 गुण

