मजूराच्या मुलाला Air Force ची नोकरी, बापाच्या हातात ठेवलं Joining Letter, डोळ्यांत पाणी आणणारा क्षण..
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
रविच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे त्याने मुलांची शिकवणीही घेतली. त्याने आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोचिंग संस्थेत प्रवेश घेतला. त्याला कोचिंगला जाण्यासाठी रोज पहाटे 4 वाजता घरातून निघावे लागायचे.
धीर राजपूत, प्रतिनिधी
फिरोजाबाद : असे म्हटले जाते की, त्याच लोकांचे स्वप्न पूर्ण होतात, जे कठोर परिश्रम करुन जिद्दीने त्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतात. ग्रामीण भागातील असे विद्यार्थी जेव्हा यशस्वी होतात, तेव्हा त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. रवि कश्यप या तरुणाची कहाणीही अशीच आहे.
मजूराचा मुलगा असलेला रवि कश्यप याने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत केली आणि शेवटी आज त्याचे स्वप्न पूर्ण झाले. रवि कश्यप हा मूळचा फिरोजाबाद येथील मक्खनपूरच्या बरामई गावातील रहिवासी आहे. त्याचे आयुष्य खूप संघर्षमय राहिले आहे.
advertisement
याबाबत बोलताना त्याने सांगितले की, त्याचे वडील एका काचेच्या कारखान्यामध्ये काम करतात आणि आपल्या कुटुंबाच उपजीविका भागवत आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने फी भरायला खूप त्रास झाला. त्याचे बालपणापासूनच स्वप्न होते की, त्याने डिफेन्समध्ये नोकरी करावी. त्यामुळे त्याने हवाई दलाच्या तयारीसाठी फिरोजाबादच्या नौदल संरक्षण अकादमीत प्रवेश घेतला.
advertisement
दररोज 15 किमी सायकलचा प्रवास -
रविच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे त्याने मुलांची शिकवणीही घेतली. त्याने आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोचिंग संस्थेत प्रवेश घेतला. त्याला कोचिंगला जाण्यासाठी रोज पहाटे 4 वाजता घरातून निघावे लागायचे. कोचिंगला जाण्यासाठी त्याला 15 किमी सायकल चालवावी लागायची. अनेक दिवस अशाप्रकारे त्याने मेहनत केली आणि शेवटी त्याला यश मिळाले. मेहनतीला फळ मिळाले आणि त्याची भारतीय वायुसेनेत निवड झाली, अशी माहिती त्याने दिली.
advertisement
मेहनतीला मिळाले फळ
view commentsकोचिंग संस्था चालवणारे मयंक शर्मा यांनी सांगितले की, त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी त्याला फ्रीमध्ये कोचिंग देण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर रविने अत्यंत मेहनत करुन आज हे यश मिळवले. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते त्यांच्याकडून फी घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. रविचीही परिस्थिती तशीच होती. आज त्याची निवड झाल्यानंतर मला विशेष आनंद होत आहे, असे ते म्हणाले.
Location :
Firozabad,Uttar Pradesh
First Published :
March 19, 2024 2:18 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
मजूराच्या मुलाला Air Force ची नोकरी, बापाच्या हातात ठेवलं Joining Letter, डोळ्यांत पाणी आणणारा क्षण..


