Best Job : फक्त एका आठवड्याची ट्रेनिंग, वर्षाला 66 लाखांची कमाई; डिग्रीचीही गरज नाही, अजब नोकरी करतोय हा माणूस
- Published by:Shreyas
Last Updated:
भरपूर पगाराची नोकरी करण्यासाठी बराच अभ्यास करायला लागायचे दिवस आता गेले. आता काही जण कमी कालावधीतल्या ट्रेनिंगमध्ये भरघोस कमाई करत आहेत.
मुंबई : भरपूर पगाराची नोकरी करण्यासाठी बराच अभ्यास करायला लागायचे दिवस आता गेले. आता काही जण कमी कालावधीतल्या ट्रेनिंगमध्ये भरघोस कमाई करत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या या व्यक्तीला पाहून तुम्हालाही असंच वाटेल. या माणसाने फक्त एका आठवड्याची ट्रेनिंग घेतली आहे आणि तो प्रत्येक वर्षाला 66 लाख रुपये कमवत आहे. कोणीही जिगरवाला माणूस ही नोकरी करू शकतो आणि भरपूर पैसे कमावू शकतो, असा या व्यक्तीचा दावा आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार जॉब एप गेटहेडने सिडनीमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला, यात हा माणूस आपण प्रत्येक तासाला ऑस्ट्रेलियन लोकांपेक्षा जास्त कमवत आहोत, असं सांगतोय. हा माणूस नेमकं करतो काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. याचं उत्तरही त्यानेच दिलं आहे. आपण ऑस्ट्रेलियाच्या राजधानीच्या गगनचुंबी इमारतींवर काम करतो. या इमारतींच्या खिडक्यांची सफाई करण्यापासून ते तुटलेल्या गोष्टी दुरुस्त करण्याचं काम मी करतो. जुन्या इमारतींना कधी कधी भेगा पडतात, त्या भरण्याचं कामही करतो, असं या व्यक्तीने सांगितलं आहे.
advertisement
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये व्यक्तीने सांगितलं की इंडस्ट्रीयल एक्सेस ट्रेड असोसिएशन (IRATA) यासाठी ट्रेनिंग देतं, हे ट्रेनिंग फक्त एका आठवड्याचं असतं, प्रशिक्षण घेतल्यानंतर मला लगेचच सिडनीमध्ये चांगली नोकरी मिळाली. याला रोप ऍक्सेस वर्कर म्हणलं जातं, असं त्याने सांगितलं.
ऑस्ट्रेलियामध्ये एक रोप ऍक्सेस वर्कर प्रत्येक तासाला 60 डॉलर म्हणजेच जवळपास 5 हजार रुपये कमावतो. हे काम करणारा कर्मचारी वर्षाला 80 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 66 लाख रुपयांची कमाई करतो.
advertisement
'सुरूवातीला हे मजेदार वाटलं नाही, पण काही दिवसांनी सवय झाली आणि मग मजा यायला सुरूवात झाली. आता तर हे खूप रोमांचक वाटतं. जेव्हा तुम्ही रोज काम करता तेव्हा हा तुमच्या दिनचर्येचा भाग बनतो. पण तुम्हाला उंचीची भीती वाटत असेल, तर हे काम तुमच्यासाठी नाही. पण सुरक्षेची पूर्ण गॅरंटी असते, कारण तुमच्या शरिराला दोरी बांधलेली असते, ज्यामुळे तुम्ही जमिनीवर पडत नाही. फक्त एका आठवड्याच्या ट्रेनिंगने ही नोकरी मिळते, हे ऐकून लोकांनाही आश्चर्य वाटलं,' असं तो म्हणाला. मॅनेजमेंटची डिग्री घेणाऱ्यांना जवळपास 90 लाखांचं पॅकेज मिळतं, पण त्यांना डिग्रीसाठी 3 वर्ष लागतात, त्या हिशोबाने हे जास्त आहे, अशी कमेंट एकाने केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 20, 2024 6:30 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
Best Job : फक्त एका आठवड्याची ट्रेनिंग, वर्षाला 66 लाखांची कमाई; डिग्रीचीही गरज नाही, अजब नोकरी करतोय हा माणूस


