Government Jobs: 51 हजारपेक्षा जास्त सरकारी नोकऱ्या; तुम्ही पात्र असाल त्यासाठी करा अर्ज!
- Published by:Sayali Zarad
- trending desk
Last Updated:
तुम्ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तयारी करत असाल तर आता रेल्वे, यूपीएससी आणि एसएससीने काही रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आहे. यापैकी तुम्ही ज्या पदांसाठी पात्र असाल त्यासाठी अर्ज करू शकता. या नोकऱ्या वेगवेगळ्या वयोगटातल्या व्यक्तींसाठी आहेत.
नवी दिल्ली : तुम्ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तयारी करत असाल तर आता रेल्वे, यूपीएससी आणि एसएससीने काही रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आहे. यापैकी तुम्ही ज्या पदांसाठी पात्र असाल त्यासाठी अर्ज करू शकता. या नोकऱ्या वेगवेगळ्या वयोगटातल्या व्यक्तींसाठी आहेत. तुम्ही तुमचं शिक्षण, वय यानुसार अर्ज करू शकता.
रेल्वेमध्ये 11 हजार जागांसाठी भरती
तुम्हाला जर रेल्वेमध्ये नोकरी करायची असेल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण रेल्वेत 11 हजार जागांवर भरती केली जाणार आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने (RRB) एकूण 11,558 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्या पदांची संपूर्ण माहिती rrbapply.gov.in या आरआरबी वेबसाइटवर दिली आहे. या भरतीसाठी अर्ज 14 सप्टेंबरपासून करता येतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर आहे. या पदांसाठी हायर सेकंडरी किंवा ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 18 ते 33 वर्षांच्या दरम्यान असावं. निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 रुपये ते 35,400 रुपये मासिक पगार मिळेल.
advertisement
एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती : 39,000 रिक्त जागा
एसएससी जीडी कॉन्स्टेबलकडून केंद्रीय पोलीस दलात एकूण 39,481 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचं वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावं. या पदांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 5 सप्टेंबरपासून सुरू झाली असून, ती 15 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे तुम्ही यासाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शेवटच्या तारखेची वाट पाहू नका आणि त्यापूर्वी अर्ज करा. या पदांवर निवड झाल्यास मासिक 18,000 रुपये ते 69,000 रुपये पगार मिळेल. या संदर्भात अधिक तपशील एसएससीच्या अधिकृत वेबसाइटवर अर्थात ssc.gov.in वर पाहता येतील.
advertisement
यूपीएससीमध्येही नोकऱ्या
केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीमध्ये एकूण 85 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पदांसाठी 4 सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर आहे. या पदांसाठी उमेदवाराने जियोलॉजिकल सायन्स/झूलॉजी/फिजिक्स/केमिस्ट्री यापैकी एका विषयात मास्टर्स पदवी घेतलेली असावी. या पदांसाठी उमेदवाराचं वय 21 ते 32 वर्षांदरम्यान असावं. या पदांवरची निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होईल. या संदर्भातले अधिक तपशील यूपीएससीच्या upsconline.nic.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2024 10:44 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Government Jobs: 51 हजारपेक्षा जास्त सरकारी नोकऱ्या; तुम्ही पात्र असाल त्यासाठी करा अर्ज!