National Health Mission Recruitment 2025 : NHM मुंबईमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळणार 1 लाखापर्यंत पगार, अर्ज कसा आणि कुठे कराल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Career news : राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई (National Health Mission, Mumbai) ने विविध पदांसाठी भरतीची मोठी घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष), सल्लागार (आयुष), खाते आणि वित्त व्यवस्थापक (आयुष), एचएमआयएस व्यवस्थापक (आयुष), डेटा एंट्री ऑपरेटर, वित्त व्यवस्थापक, रुग्णालय सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक, बायोमेडिकल अभियंता, मॉनिटरिंग आणि मूल्यांकन अधिकारी तसेच इतर अनेक पदांसाठी एकूण 181 जागा उपलब्ध आहेत.
मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई (National Health Mission, Mumbai) ने विविध पदांसाठी भरतीची मोठी घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष), सल्लागार (आयुष), खाते आणि वित्त व्यवस्थापक (आयुष), एचएमआयएस व्यवस्थापक (आयुष), डेटा एंट्री ऑपरेटर, वित्त व्यवस्थापक, रुग्णालय सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक, बायोमेडिकल अभियंता, मॉनिटरिंग आणि मूल्यांकन अधिकारी तसेच इतर अनेक पदांसाठी एकूण 181 जागा उपलब्ध आहेत.
पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 21 फेब्रुवारी 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर तपशीलांसाठी खालील माहिती वाचावी.
पदांची नावे
राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष)
सल्लागार (आयुष)
खाते आणि वित्त व्यवस्थापक (आयुष)
एचएमआयएस व्यवस्थापक (आयुष)
डेटा एंट्री ऑपरेटर
वित्त व्यवस्थापक
advertisement
रुग्णालय सल्लागार
कार्यक्रम व्यवस्थापक
बायोमेडिकल अभियंता
मॉनिटरिंग आणि मूल्यांकन अधिकारी
इतर विविध पदे
एकूण रिक्त जागा
181 पदे
शैक्षणिक पात्रता
पदानुसार शैक्षणिक पात्रता भिन्न असेल. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.
वयोमर्यादा
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी - कमाल वयोमर्यादा 43 वर्षे
अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी - कमाल वयोमर्यादा 38 वर्षे
अर्ज शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी: ₹750/-
advertisement
राखीव प्रवर्गासाठी: ₹500/-
अर्ज करण्याची पद्धत
ऑफलाइन अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
राज्य आरोग्य सोसायटी कार्यालय, मुंबई, आरोग्य भवन, तिसरा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, पी. डिमेलो रोड, सीएसएमटी स्टेशन जवळ, फोर्ट, मुंबई – 400001.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 16, 2025 11:40 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
National Health Mission Recruitment 2025 : NHM मुंबईमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळणार 1 लाखापर्यंत पगार, अर्ज कसा आणि कुठे कराल?


