advertisement

NTPC Recruitment 2025 : NTPC या सरकारी संस्थेत 400 पदांची भरती! महिन्याला 50,000 रु पगार,अर्ज कसा आणि कुठे कराल?

Last Updated:

Career News : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये भरती सुरू झाली असून, एकूण 400 रिक्त पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत.

News18
News18
मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये भरती सुरू झाली असून, एकूण 400 रिक्त पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचावी.
महत्त्वाच्या तारखा कोणत्या?
अर्ज प्रक्रिया सुरू – 15 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 01 मार्च 2025
पद व पात्रता
पदाचे नाव सहाय्यक कार्यकारी (Assistant Executive)
रिक्त जागा - 400
शैक्षणिक पात्रता
सदर भरती प्रक्रियासाठी इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये B.Tech पदवी आवश्यक आहे.
भरती प्रक्रिया
उमेदवारांची निवड तीन टप्प्यात केली जाईल. जसे कि, लेखी परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी, मेडिकल तपासणी
advertisement
वयोमर्यादा किती?
SC/ST उमेदवारांना – 5 वर्षांची सवलत
OBC उमेदवारांना – 3 वर्षांची सवलत
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
NTPC च्या www.ntpc.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या नंतर करिअर सेक्शनमध्ये जा आणि "EET-2025" भरतीसाठी अर्ज करा. सर्व आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंट डाऊनलोड करून ठेवा.
advertisement
नोकरी ठिकाण
ही भरती संपूर्ण भारतभर विविध शाखांमध्ये केली जाणार आहे.
जर तुम्हाला NTPC मध्ये नोकरी मिळवायची असेल तर संधी गमावू नका! लवकरात लवकर 01 मार्च 2025 पूर्वी अर्ज करा आणि सरकारी नोकरीची संधी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
NTPC Recruitment 2025 : NTPC या सरकारी संस्थेत 400 पदांची भरती! महिन्याला 50,000 रु पगार,अर्ज कसा आणि कुठे कराल?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement