Open Book Exam - आता थेट पुस्तक उघडूनच परीक्षेला बसा! बोर्डाचा निर्णय; फायदा काय?

Last Updated:

न्यू नॅशनल करिकुलम फ्रेमवर्क 2023 मध्ये ओपन बुक एक्झामचा उल्लेख करण्यात आला होता.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : परीक्षा म्हटलं की पुस्तकातील धडे वाचून ते लक्षात ठेवून न बघता पेपर देणं. काही मुलं परीक्षेत कॉपी करतात. ही कॉपी होऊ नये, यासाठी परीक्षा केंद्रावर भरारी पथकं असतात. पण आता चक्क शिक्षण बोर्डाकडूनच 'कॉपी' करण्याची मुभा मिळणार आहे. पुस्तकं उघडून परीक्षेला बसता येणार आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजे सीबीएसई ओपन बुक परीक्षेबाबत विचार करत आहे. न्यू नॅशनल करिकुलम फ्रेमवर्क 2023 मध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.  हा प्रस्ताव 2023 साली गव्हर्निंग बॉडी मीटिंगमध्ये मांडण्यात आला होता. आता काही मोजक्या शाळांमध्ये ओपन बुक प्रायोगिक तत्वावर लवकरच सुरू होणार आहे.
advertisement
दिल्ली युनिव्हर्सिटीने कोरोना महासाथीत ओपन बुक टेस्टची सुरुवात केली होती. सुरुवातीला याला विरोध झाला होता मात्र नंतर तो सर्वांनी स्वीकारला. त्यामुळे सीबीएसई बोर्ड या परीक्षची तयारी करण्यासाठी दिल्ली युनिव्हर्सिटीची मदत घेणार आहे. ओपन बुक एक्झाम लागू करण्याआधी बोर्ड याबाबत बऱ्याच टेस्ट घेऊन त्या किती प्रभावशाली ठरतील हे जाणून घेणार. जूनपर्यंत या परीक्षेचं अंतिम स्वरूप तयार होऊ शकतं. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अशी परीक्षा होण्याची शक्यता आहे.
advertisement
ओपन बुक एक्झाममध्ये अंतर्गत नववी ते दहावी विद्यार्थ्यांना पुस्तक उघडून परीक्षा देण्यास परवानगी असेल. नववी, दहावीच्या इंग्रजी, गणित आणि विज्ञान तर अकरावी, बारावीच्या इंग्रजी, गणित आणि बायोलॉजीसारख्या परीक्षा घेतल्या जातील. अशी परीक्षा देण्यात विद्यार्थ्यांना किती वेळ लागतो ते पाहिलं जाईल. तसंच विद्यार्थ्यांचा फिडबॅकही घेतला जाईल.
advertisement
ओपन बुक एक्झामचा उद्देश उच्च शिक्षा रणनीती आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांची रचनात्मक आणि विश्लेषण क्षमता अधिक वाढेल. सीबीएसईच्या मते, यामुळे विद्यार्थ्यांची समस्या आणि समाधान करण्याच्या क्षमतेवर जोर दिला जाईल.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Open Book Exam - आता थेट पुस्तक उघडूनच परीक्षेला बसा! बोर्डाचा निर्णय; फायदा काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement