PM Yasasvi 2023: अडीच तासांत मिळवा 1 लाखांची शिष्यवृत्ती; फक्त ही परीक्षा उत्तीर्ण व्हा
- Published by:Rahul Punde
Last Updated:
PM Yasasvi Scheme 2023: एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी अनेक प्रकारच्या परीक्षा घेते. यामध्ये प्रवेश परीक्षांपासून ते शिष्यवृत्तीपर्यंतच्या परीक्षांचा समावेश होतो. अलीकडेच, भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने yet.nta.ac.in वर पंतप्रधान यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम (PM YASASVI स्कीम 2023) चे प्रवेशपत्र जारी केले आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व तपशील जाणून घेऊ.
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती हे वरदानापेक्षा कमी नाही. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांना शिष्यवृत्तीचा भरपूर लाभ मिळतो. शासनाने अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना सुरू केल्या आहेत. NTA द्वारे आयोजित यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप पुरस्कार योजना इयत्ता 9 वी आणि 11 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे (Young Achievers Scholarship 2023).
शासनाची ही विशेष शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसावे लागणार आहे. यासाठीची प्रवेशपत्रे yet.nta.ac.in वर जारी करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी या साइटवर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र (PM YASASVI Scheme 2023 Admit Card Download) डाउनलोड करण्यासाठी अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकावा लागेल. प्रवेशपत्राची लिंक 23 सप्टेंबर 2023 रोजी सक्रिय होईल.
शिष्यवृत्तीसाठी परीक्षा कधी होणार?
NTA ने त्यांच्या वेबसाइटवर यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीमशी संबंधित तपशील जारी केला आहे. PM YASASVI ची परीक्षा 29 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. प्रवेशपत्राशिवाय तुम्हाला ही परीक्षा देता येणार नाही. 11 जुलै 2023 (PM Young Achievers Scholarship 2023) पासून पंतप्रधान यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
advertisement
2.5 तास, 100 प्रश्न
PM YASASVI शिष्यवृत्ती परीक्षा 150 मिनिटांची म्हणजेच अडीच तासांची असेल. यामध्ये 100 पर्यायी प्रश्न विचारले जातील. विद्यार्थ्यांना 4 पर्यायांपैकी एक निवडून योग्य उत्तर द्यावे लागेल. ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषेत ओएमआर शीटवर असेल. या परीक्षेद्वारे देशभरातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये इयत्ता 9 वी आणि 11 वी च्या OBC, EBC आणि DNT प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
advertisement
PM YASASVI Admit Card 2023 कसे डाउनलोड करायचे?
पंतप्रधान यंग अचिव्हर्स स्कॉलरशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दरवर्षी 75,000 ते रु. 1,20,000 पर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाते. PM YASASVI Admit Card 2023 डाउनलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा-
1- शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइट nta.ac.in किंवा yet.nta.ac.in वर जा.
advertisement
2- अॅडमिट कार्ड पेज लिंकवर क्लिक करा.
3- अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर व्ह्यू बटणावर क्लिक करा.
4- प्रवेशपत्रावर प्रविष्ट केलेले तपशील तपासा आणि सेल्फ व्हेरीफाय करा.
Location :
Delhi
First Published :
Sep 21, 2023 6:45 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
PM Yasasvi 2023: अडीच तासांत मिळवा 1 लाखांची शिष्यवृत्ती; फक्त ही परीक्षा उत्तीर्ण व्हा








