Police Bharati 2025: तुम्हालाही मिळेल खाकी वर्दी, 15,300 जागांसाठी पोलीस भरती, अर्जासाठी मोजकेच दिवस शिल्लक

Last Updated:

Police Bharati 2025: राज्यात 15,300 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. खाकी वर्दीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी शेवटची संधी आहे.

Police Bharati 2025: राज्यात 15,300 जागांसाठी पोलीस भरती, लगेच करा अर्ज, मोजकेच दिवस शिल्लक
Police Bharati 2025: राज्यात 15,300 जागांसाठी पोलीस भरती, लगेच करा अर्ज, मोजकेच दिवस शिल्लक
पुणे : पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी पोलिस भरतीची घोषणा केली होती. आता महाराष्ट्र राज्य पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यभरात एकूण 15 हजार 300 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले असून, यात पोलिस शिपाई, पोलिस शिपाई (वाहनचालक), एसआरपीएफ शिपाई, पोलिस बॅण्ड्समन आणि कारागृह शिपाई या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांना 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
बारावी उत्तीर्ण उमेदवारांना मिळणार संधी
भरती प्रक्रियेत सुरुवातीला उमेदवारांची शारीरिक पात्रता चाचणी होईल. ही चाचणी 50 गुणांची असेल. त्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा 100 गुणांची द्यावी लागेल. अंतिम निवड ही दोन्ही चाचण्यांतील गुण एकत्र करून केली जाईल. अर्जदाराने बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पुरुषांसाठी किमान उंची 165 सेंमी, तर महिलांसाठी 155 सेंमी निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे. शारीरिक चाचणीत धाव, गोळाफेक आणि लांब उडी या प्रकारांचा समावेश असेल.
advertisement
वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना दिलासा
सरकारने यंदाच्या पोलिस भरतीसाठी एक वर्षांची अतिरिक्त वयोमर्यादा सवलत लागू केली आहे. त्यामुळे मागील भरतीवेळी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही यावेळी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे अनेक उमेदवारांचं पोलिस बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
कुठे आणि कसा करायचा अर्ज?
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. उमेदवारांनी www.mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Police Bharati 2025: तुम्हालाही मिळेल खाकी वर्दी, 15,300 जागांसाठी पोलीस भरती, अर्जासाठी मोजकेच दिवस शिल्लक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement