Police Bharti 2025 : तरूणांसाठी मोठी बातमी! फेब्रुवारीनंतर होणार 10,000 पोलिसांची भरती

Last Updated:

police bharti 2025 Recruitment : राज्यभरातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिस भरतीची घोषणा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण पाहता राज्य सरकार मोठ्या प्रमाणात पोलिस भरती करण्याच्या विचारात आहेत.

News18
News18
मुंबई : राज्यभरातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिस भरतीची घोषणा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण पाहता राज्य सरकार मोठ्या प्रमाणात पोलिस भरती करण्याच्या विचारात आहेत. गुन्हेगारीचा तपास करणे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार 10 हजार पदांची भरती करणार आहे. अशी माहिती मिळत आहे.
रिक्त पदांचा घेतला आढावा 
प्रशिक्षण आणि खास पथके विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व शहर पोलिस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिस आयुक्तालयाकडून रिक्त पदांचा आढावा मागितला आहे. 2024 पर्यंत रिक्त झालेल्या पदांची यादी मागवण्यात आली आहे. या पोलिस भरतीची सराव चाचणी ही पावसाळ्याआधी करण्याचे नियोजन आहे.
मागील भरतीसाठी 18 लाख अर्ज
मागच्यावेळी राज्यात 17 हजार पदांची भरती झाली. त्यासाठी राज्यभरातून तब्बल 18 लाख अर्ज आले होते. यावेळी देखील अशीच परिस्थिती राहील या पद्धतीने भरतीचे नियोजन करण्यात येणार आहे.
advertisement
लवकर भरती प्रक्रिया सुरू केली जाणार
प्रशिक्षण व खास पथकाचे अपर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, ''रिक्त पदांची माहिती मागवली आहे. त्यानुसार लवकरच भरती केली जाणार आहे. रिक्त पदांची माहिती मागवण्यात आलेली आहे. सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल''.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Police Bharti 2025 : तरूणांसाठी मोठी बातमी! फेब्रुवारीनंतर होणार 10,000 पोलिसांची भरती
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement