करिअरला मिळेल नवा आयाम; कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात शिका आता पोर्तुगीज भाषा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
जगभरात सर्वत्र सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक भाषा शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांना शिकता येणार आहे.
कोल्हापूर,14 डिसेंबर : शिवाजी विद्यापीठ हे सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्ञानमंदिरच आहे. या ठिकाणी विविध कला, साहित्य, भाषा आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात पारंगत होण्यासाठी देश विदेशातूनही विद्यार्थी येत असतात. त्यातच आता जगभरात सर्वत्र सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक भाषा शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांना शिकता येणार आहे. शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागाच्या एका करारामुळे विद्यार्थ्यांसाठी आता पोर्तुगीज भाषेचा अभ्यासक्रम उपलब्ध झाला आहे.
नुकताच शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागाने पोर्तुगाल देशातील लिस्बन येथील ‘द कमॉइश इन्स्टिट्यूट फॉर कोऑपरेशन अँड लँग्वेज’ यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आहे. त्यामुळे आता या कराराअंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता पोर्तुगीज भाषा शिकता येणार आहे. ‘द कमॉइश इन्स्टिट्यूट फॉर कोऑपरेशन अँड लँग्वेज’, ही संस्था पोर्तुगाल देशाची अधिकृत आंतरराष्ट्रीय संस्था आहे. भारतात पोर्तुगीज भाषा आणि संस्कृतीच्या अभ्यास आणि प्रसारासाठी समर्पित कार्य या संस्थेकडून केले जाते. तसेच या संस्थेमार्फत पोर्तुगीज भाषेचे विविध अभ्यासक्रमही चालतात.
advertisement
5 वेळा नापास झाल्यानंतर IPS, नंतर IAS झाला लातूरचा विशाल, सांगितलं UPSC क्रॅक करण्याचं सीक्रेट
पोर्तुगीज भाषा आणि महाराष्ट्र किंवा भारत यांचा संबंध खूप जुना आहे. साधारण पंधरा व्या शतकात वास्को-द-गामा भारतात आल्यानंतर पुढे बरीच वर्ष पोर्तुगीजांचा भारताशी संबंध राहिलेला आहे. तर पोर्तुगीज भाषा ही जगभरातील काही देशांची अधिकृत भाषा देखील आहे. त्यामुळे पोर्तुगीज बोलणारे लोक अनेक ठिकाणी आहेत. त्यांच्याशी आपल्या विविध गोष्टींचे आदानप्रदान करतेवेळी आपल्याला ही पोर्तुगीज भाषा उपयुक्त ठरते, असे विदेशी भाषा विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी सांगितले.
advertisement
करिअरला मिळेल नवा आयाम
कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ हे पोर्तुगीज भाषा शिकवणारे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. आता या अभ्यासक्रमामुळे विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, प्राध्यापकांना पोर्तुगीज भाषेच्या अध्ययनाची संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेत आपल्या करिअरला नवा आयाम देण्याचा प्रयत्न ही भाषा शिकून करता येणार आहे, असे मत देखील पानसरे यांनी व्यक्त केले.
advertisement
विद्यार्थी देऊ शकतील ऐतिहासिक योगदान
पोर्तुगीज भाषा शिकून विद्यार्थ्यांना भविष्यात विविध पद्धतींचे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक असे अनेक लाभ होऊ शकतात. त्याचबरोबर मराठा इतिहासातील अनेक कागदपत्रे देखील पोर्तुगीज भाषेत आहेत. या नव्या अभ्यासक्रमामुळे इतिहास क्षेत्रातील अनेक विद्यार्थी पोर्तुगीज भाषा शिकून ही ऐतिहासिक कागदपत्रांच्या भाषांतराच्या माध्यमातून मोठे योगदान देऊ शकतात, असेही मेघा पानसरे यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान 2019 मध्ये शिवाजी विद्यापीठात पोर्तुगीज भाषेचा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आला होता. मात्र कोरोना काळात तो थांबवण्यात आला होता. त्यामुळे आता पुन्हा डिसेंबर 2023 पासून शिवाजी विद्यापीठातील पोर्तुगीज भाषा अभ्यासक्रम सुरु झाला असून त्याचा लाभ सर्वच इच्छुक विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
December 14, 2023 5:57 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
करिअरला मिळेल नवा आयाम; कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात शिका आता पोर्तुगीज भाषा

