शिक्षणासाठी बाहेर राहण्याचं टेन्शन सोडा! अल्पसंख्यांक विभागाचा मोठा निर्णय

Last Updated:

Girls Education: अल्पसंख्यांक विभागाच्या या निर्णयमाळे दहावी ते बारावी, पदविका, पदविका समकक्ष, आयटीआय, तंत्रनिकेतनचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोठा लाभ होणार आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी मोठी संधी, अल्पसंख्यांक विभागाचा मोठा निर्णय
महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी मोठी संधी, अल्पसंख्यांक विभागाचा मोठा निर्णय
पुणे : शिक्षणासाठी बाहेर राहणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी बांधलेल्या वसतिगृहांच्या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अल्पसंख्याक समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थिनींना वसतिगृहाचा लाभ घेता येण्यासाठी उच्च शिक्षणाव्यतिरिक्त अन्य विद्यार्थिनींनाही वसतिगृहांत प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानुसार वसतिगृहातील रिक्त जागांवर अल्पसंख्याक समाजातील दहावी ते बारावी, आयटीआय, पदविका, तंत्रनिकेतनमघील विद्यार्थिनींनाही प्रवेश दिला जाणार आहे. या निर्णयामुळे गरजू विद्यार्थिनींची सोय होऊ शकणार आहे.
नुकतेच अल्पसंख्याक विकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. या वसतिगृहांतील प्रवेशासाठीचे निकष 2013 आणि 2021 मध्ये निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठीच्या वसतिगृहात बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर वसतिगृहातील जागा रिक्त राहिल्यास त्या जागांवर दहावी ते बारावी, पदविका, पदविका समकक्ष, आयटीआय, तंत्रनिकेतन संस्थांतील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेश देण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थिनींकडून 2013 आणि 2014 मध्ये निश्चित केलेले शुल्क आकारण्यात येणार आहे.
advertisement
दरम्यान, अल्पसंख्यांक विभागाच्या या निर्णयमाळे दहावी ते बारावी, पदविका, पदविका समकक्ष, आयटीआय, तंत्रनिकेतनचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोठा लाभ होणार आहे. तसेच अत्यंत अल्प शुल्कात राहण्याची सोय होणार असल्याने शिक्षण सुलभ होणार आहे. तर या सुविधेचा अधिकाधिक विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा, असं आवहन करण्यात आलंय.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
शिक्षणासाठी बाहेर राहण्याचं टेन्शन सोडा! अल्पसंख्यांक विभागाचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
Beed Crime News : कामाचं आमिष दाखवलं,  बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं!
कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं
  • कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं

  • कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं

  • कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं

View All
advertisement