Pink e-Rickshaw: पिंक ई-रिक्षा योजना नेमकी काय? कसा होणार महिलांना फायदा, संपूर्ण माहिती
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pink e-Rickshaw Scheme: पुण्यातील महिलांसाठी सुवर्णसंधी असून राज्य सरकारने पिंक ई-रिक्षा योजना जाहीर केलीये. लाभार्थी महिलांना ही रिक्षा चालविण्यासाठीचे प्रशिक्षण आणि वाहन परवानादेखील मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुलाबी (पिंक) रिक्षा खरेदी करण्यास अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. राज्य सरकारने नुकतीच 'पिंक ई-रिक्षा' ही योजना राज्यात लागू केली आहे. त्याची अंमलबजावणी पालिकेकडून केली जाणार आहे. रिक्षासाठी कर्जाचा व्याजदर देखील कमी असून महिलांनी 5 वर्षांमध्ये महिन्याला 6 हजार रुपयांचा हप्ता भरून याची परतफेड करायची आहे. पिंक ई-रिक्षा योजनेमुळे गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
advertisement
महाराष्ट्र शासनाने पिंक ई-रिक्षा योजना ही विशेष महिलांसाठी लागू केली आहे. यामध्ये पुणे महापालिका शहरासाठी काम करत आहे. यासोबत महिला बालकल्याण, आयसीडीसी प्रोजेक्ट महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगर पालिका हे एकत्रित पणे काम करत आहेत. या योजनेमध्ये लाभार्थीचा एक हिस्सा राज्य शासनाचे अनुदान आणि बँकांचे कर्ज या तिन्हींचा समन्वय करून ही योजना राबवली जात आहे.
advertisement
पिंक ई-रिक्षा योजनेचे फायदे
या रिक्षासाठी भाडे निश्चित करून दिले असून मार्ग देखील निश्चित केले आहे. मेट्रो, गर्दीचे रस्ते, वाहनतळ, रेल्वे स्टेशन किंवा मेट्रो स्टेशन, पीएमपी, बस स्टॅन्ड या ठिकाणी लवकर पोहचता यावे, यासाठी या ई-रिक्षांचा उपयोग होणार आहे. फक्त 12 हजार 300 रुपये भरून या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर बँकांनी दिलेल्या कर्जाचा हप्ता महिन्याला 6 हजार याप्रमाणे फेडता येईल.
advertisement
काय आहेत अटी?
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 20 ते 40 असलं पाहिजे. त्यांचं बँकेत खातं असावं. वार्षिक उत्पन्न हे 3 लाखा पेक्षा जास्त नसावं. विधवा, कायद्याने घटस्फोट, दारिद्र्य रेषेखालील महिलांना लाभ घेता येणार आहे. अंगणवाडी सेविका, पालिकेच्या समूह संघटिका, समाज विकास, पालिका वॉर्ड 15 इथे अर्ज करता येतील.
advertisement
या रिक्षांची नोंदणी आणि विमा वितरकांकडून मोफत काढला जाणार आहे. तसेच संबंधित लाभार्थी महिलांना ही रिक्षा चालविण्यासाठीचे प्रशिक्षण आणि वाहन परवानादेखील या वितरकांमार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमधील समाज विकास विभागाच्या कार्यालयात या योजनेची माहिती मिळणार असल्याचे महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी सांगितले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
January 21, 2025 9:46 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Pink e-Rickshaw: पिंक ई-रिक्षा योजना नेमकी काय? कसा होणार महिलांना फायदा, संपूर्ण माहिती

