वडील आजारी, आईने मोठ्या कष्टाने शिकवलं, कोल्हापूरचा ऋषिकेश बनला फ्लाईंग ऑफिसर

Last Updated:

कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी पेठ परिसरात राहणाऱ्या ऋषिकेश इंगवलेची ही गोष्ट आहे. या तरुणाची इंडीयन एअर फोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर यापदी निवड झाली आहे. इतकेच नव्हे तर ऋषिकेशने यासाठी घेण्यात येणाऱ्या टेक्निकल कोर्स परीक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकावलाय.

+
News18

News18

निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : भारतीय संरक्षण दलात काम करण्याचे स्वप्न त्यानं उरी बाळगलं. वडील आजारी, अंथरुणात खिळून होते. आईने मोठ्या कष्टाने त्याला शिकवलं, त्याला मोठं केलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं. अखेर उरी बाळगलेलं भारतीय संरक्षण दलात काम करण्याच स्वप्न त्यानं पूर्ण केलं. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी पेठ परिसरात राहणाऱ्या ऋषिकेश इंगवलेची ही गोष्ट आहे. या तरुणाची इंडीयन एअर फोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर यापदी निवड झाली आहे. इतकेच नव्हे तर ऋषिकेशने यासाठी घेण्यात येणाऱ्या टेक्निकल कोर्स परीक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकावलाय.
advertisement
कोल्हापुरातील महाराष्ट्र हायस्कूल इथं ऋषिकेश इंगवलेचे शिक्षण झालं. तो 2015 सालचा दहावी बोर्ड परीक्षेत टॉपर होता. त्यानं भारती विद्यापीठमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. तो 2021 मध्ये शिवाजी विद्यापीठात टॉपर होता. शाळेत इयत्ता आठवीत असताना त्यानं एनसीसी जॉईन केली होती. त्यात या क्षेत्राची त्याला माहिती झाली. त्यानं संरक्षण दलामध्ये काम करण्याच ध्येय ठरवलं आणि त्या मार्गानं त्याचा प्रवास सुरू केला.
advertisement
घरगुती अडचणीमुळे संधी हुकली, पण तो हरला नाही
इयत्ता दहावीनतर त्याचं छत्रपती संभाजीनगरमध्ये यातून सिलेक्शन झालं होतं. मात्र घरगुती अडचणीमुळे त्याची संधी हुकली. त्यानंतर त्यानं एनडीए, सिडीएससाठी प्रयत्न केले. त्यानंतर घेतलेल्या अनुभवातून ही परीक्षा त्यानं दिली आणि त्यात तो यशस्वी झाला.
advertisement
ऋषिकेशच्या या कामगिरीच अगदी सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. वडिलांच्या आजारपणामुळे घरच्यांनाही त्याच्या शिक्षणाकडे पूर्ण लक्ष देता आला नाही. मात्र त्यानं मोठ्या कष्टाने आपलं शिक्षण पूर्ण केल्याच त्याची मोठी बहीण ज्योत्स्ना निखिल जमदाडे यांनी सांगितलं.
फ्लाईंग ऑफिसर म्हणजे काय?
भारतीय हवाई दल (IAF) मध्ये फ्लाईंग ऑफिसर बनू इच्छिणारे AFCAT, UPSC NDA, NCC आणि UPSC CDS परीक्षेद्वारे अर्ज करू शकतात. इथे आम्ही 12 वी उत्तीर्ण किंवा पदवीधर भारतीय वायुसेनेच्या फ्लाइंग शाखेत करिअर करू शकणारे विविध मार्ग सांगत आहोत. उमेदवार फ्लाइंग ऑफिसर म्हणून त्यांची कारकीर्द सुरू करू शकतात आणि एअर मार्शलच्या पदापर्यंत पोहोचू शकतात. दरम्यान फ्लाईंग ब्रँचमधून निवडलेली व्यक्ती हवाई दल प्रमुख बनते.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
वडील आजारी, आईने मोठ्या कष्टाने शिकवलं, कोल्हापूरचा ऋषिकेश बनला फ्लाईंग ऑफिसर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement