परीक्षा न देता RBI मध्ये अधिकारी होण्याची संधी, कुठे आणि कसा करायचा अर्ज?

Last Updated:

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तुमच्याकडे या पदाशी संबंधित पात्रता असल्यास rbi.org.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात.

News18
News18
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ही देशातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. देशाशी संबंधित आर्थिक निर्णयांची अंमलबजावणी करणं आणि इतर बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याचं काम आरबीआय करते. अशा ठिकाणी नोकरी मिळवणं, हे अनेकांचं स्वप्न असतं. ज्यांना आरबीआयमध्ये नोकरी मिळवण्याची इच्छा आहे, अशांसाठी एक सुवर्णसंधी आहे. आरबीआयने कोची येथे बँक वैद्यकीय अधिकारी (बीएमओ) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तुमच्याकडे या पदाशी संबंधित पात्रता असल्यास rbi.org.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात.
अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत होती. मात्र, आता ही मुदत 10 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जेणेकरून उमेदवारांना अतिरिक्त वेळ मिळू शकेल. इच्छुक उमेदवार 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.
पात्रता आणि अनुभव: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातील बीएमओ या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराकडे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या कोणत्याही युनिव्हर्सिटीतील 'ॲलोपॅथिक सिस्टीम ऑफ मेडिसिन'ची किमान एमबीबीएस पदवी असणं गरजेचं आहे. उमेदवाराने कोणत्याही हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये किमान दोन वर्षे मेडिकल प्रॅक्टिस केलेली असावी.
advertisement
निवड प्रक्रिया: बीएमओपदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना लेखी परिक्षा द्यावी लागणार नाही. थेट मुलाखतीच्या माध्यमातून योग्य उमेदवाराची निवड केली जाईल. मुलाखतीसाठी बोलावल्या जाणाऱ्या उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यासाठी किमान पात्रता निकष वाढवण्याचा अधिकार बँकेकडे आहे. याबाबत बँकेचा निर्णय अंतिम असेल. पात्रता निकषांची पूर्तता केलेल्या सर्वच उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता कमी आहे. बँक फक्त मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांशी पत्रव्यवहार करेल.
advertisement
आरबीआयने स्पष्ट केलं आहे की, अंतिम मुदतीत अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांचाच मुलाखतीसाठी विचार केला जाईल. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी आणि अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रं जोडावीत.
माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांनुसार, आरबीआयप्रमाणे इतर बँकांमध्ये देखील मेडिकल ऑफिसर असतो. बँकेच्या ग्राहकांना वैद्यकीय सल्ला देणं हे, या वैद्यकीय अधिकाऱ्याचं काम असतं. वैद्यकीय अधिकारी ग्राहकांना आरोग्यविषयक सल्ला देतात आणि त्यांना निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा सल्ला देतात.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
परीक्षा न देता RBI मध्ये अधिकारी होण्याची संधी, कुठे आणि कसा करायचा अर्ज?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement