SBI Recruitment 2025 : SBI मध्ये मेगाभरती! 1000+ पदसंख्या,महिन्याला 1 लाखापर्यंत पगार; अर्ज कसा आणि कुठे कराल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
SBI Recruitment apply online 2025 : बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.स्टेट बँक ऑफ इंडियाने समवर्ती लेखापरीक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.बँकेत स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी शोधणाऱ्यांनी वेळ न घालवता अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करावी.
मुंबई : बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.स्टेट बँक ऑफ इंडियाने समवर्ती लेखापरीक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.बँकेत स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी शोधणाऱ्यांनी वेळ न घालवता अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करावी. तसेच या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. संस्थेमध्ये एकूण 1194 पदे भरण्यात येणार आहेत. नोंदणी प्रक्रिया 18 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2025 आहे.
पदसंख्या
महाराष्ट्र – 91
मुंबई मेट्रो – 16
नवी दिल्ली – 68
पाटणा – 50
तिरुवनंतपुरम – 52
अहमदाबाद – 124
अमरावती – 77
बेंगळुरू – 49
भोपाळ – 70
भुवनेश्वर – 50
चंदीगड – 96
चेन्नई – 88
गुवाहाटी – 66
हैदराबाद – 79
जयपूर – 56
कोलकाता – 63
advertisement
लखनऊ – 99
पात्रता काय आहे?
अर्ज करणारा उमेदवार बँकेतून ६० वर्षांचे पूर्ण झाल्यावर सेवानिवृत्त झालेला असावा.
जर कोणी स्वेच्छेने सेवानिवृत्ती घेतली असेल, राजीनामा दिला असेल, निलंबित झाला असेल किंवा बँक सोडली असेल तर तो पात्र मानला जाणार नाही.
SBI किंवा त्याच्या पूर्वीच्या सहयोगी बँकांमधून MMGS-III, SMGS-IV/V आणि TEGS-VI या पदांवरून सेवानिवृत्त अधिकारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
advertisement
निवड प्रक्रिया कशी?
शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत या दोन टप्प्यांत निवड केली जाईल.
SBI एक शॉर्टलिस्टिंग कमिटी स्थापन करेल, जी अर्जदारांच्या पात्रतेचे निकष ठरवेल.
मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना बोलावले जाईल. मुलाखत १०० गुणांची असेल.
अंतिम निवड फक्त मुलाखतीत मिळवलेल्या गुणांच्या आधारे करण्यात येईल. जर एकाहून अधिक उमेदवारांना समान गुण मिळाले, तर वयोमानाच्या उतरत्या क्रमाने गुणवत्ता यादीत त्यांना स्थान दिले जाईल.
advertisement
अर्ज कसा करायचा?
अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर लॉगिन करा.
समवर्ती लेखापरीक्षक भरतीचा विभाग शोधा.
आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज भरा.
अर्ज अंतिम सबमिट करण्याआधी सर्व माहिती तपासा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 19, 2025 12:05 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
SBI Recruitment 2025 : SBI मध्ये मेगाभरती! 1000+ पदसंख्या,महिन्याला 1 लाखापर्यंत पगार; अर्ज कसा आणि कुठे कराल?


