Teacher Recruitment: शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी जाहीर, कधी होणार TAIT परीक्षा? संपूर्ण माहिती
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Teacher Recruitment 2025: शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदावरांसाठी आनंदाची बातमी आहे. TAIT परीक्षेची जाहिरात आली असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालीये.
पुणे: शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 24 मे ते 6 जून या काळात अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 26 एप्रिल ते 10 मे या काळात उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या युक्त अनुराधा ओक यांनी दिली.
अशी असेल परीक्षा
शिक्षक भरतीसाठी 'आयबीपीएस' या संस्थेच्या माध्यमातून अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेतली जाणार आहे. ही परीक्षा उमेदवारांना मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमातून देता येईल. 200 गुणांच्या या परीक्षेत 120 गुण अभियोग्यता, तर 80 गुण बुद्धिमत्तेसाठी असतील. या परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांतील भरतीसाठी ग्राह्य धरले जातील, असे परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
advertisement
अर्ज कसा करावा?
शिक्षक भरती चाचणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करताना नावाची नोंद ही आधार कार्डमधील नोंदीप्रमाणे असावी. परीक्षेच्या वेळी, निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दाखवणे अनिवार्य असणार आहे. ऑनलाईन अर्जातील नावात आणि आधारकार्डवरील नावाच्या नोंदीत कोणतीही तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. अर्ज सादर करताना उमेदवाराने तीन परीक्षा केंद्रांची निवड करणे अनिवार्य आहे. उमेदवारांना अधिक माहिती http://www.mscepune.in/ या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
advertisement
गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची यादी
“परीक्षा परिषदेने 2018 आणि 2019 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांनी या यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री करावी. तसेच वस्तुनिष्ठ माहिती अर्जात भरावी. या अर्जात भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही टप्प्यावर संपादणूक रद्द करण्यात येईल,” असेही ओक यांनी स्पष्ट केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
April 26, 2025 10:55 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
Teacher Recruitment: शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी जाहीर, कधी होणार TAIT परीक्षा? संपूर्ण माहिती