दहावीच्या विद्यार्थ्यांनो गणिताचं टेन्शन सोडा, या ट्रिक्स वापरून सोडवा पेपर, मिळतील पैकीच्या पैकी गुण
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
SSC Exam 2025: इयत्ता दहावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी गणिताचा पेपर सोडवण्याच्या खास ट्रिक्स जाणून घेऊ.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : इयत्ता दहावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. बोर्डाची परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांना अगोदरच पेपरचं टेन्शन असतं. जर कुठला अवघड विषय असेल तर विद्यार्थी अजूनच टेन्शन घेतात. गणिताच्या पेपरची अनेक विद्यार्थ्यांना भीती असते. तर हा गणिताचा पेपर सोडविताना कुठल्या ट्रिक्सचा वापर केला पाहिजे? कशा पद्धतीने पेपर सोडवावा आणि पैकीच्या पैकी गुण मिळवावेत? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षिका दीपा चौधरी यांनी माहिती दिली आहे.
advertisement
सर्वप्रथम तर गणिताचा पेपर सोडविताना अगोदर सर्व पेपर एकदा वाचून घ्यावा. त्यानंतर सुरुवातीला जे सोपे प्रश्न आहेत ते सोडवून घ्यावेत. नंतर इतर प्रश्न सोडवावेत. त्यासोबतच जे कंपल्सरी प्रश्न असतात ते सोडवणं अत्यंत आवश्यक असतं ते प्रश्न विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिले सोडून घ्यावे आणि नंतर एक्स्ट्राचे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवावेत.
advertisement
तसंच गणित सोडविताना कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट वापरू नये. म्हणजे गणित पूर्ण स्टेप असतात त्या सगळ्या स्टेप बाय स्टेप सोडवाव्यात. कुठलेही स्टेप मिस करू नये जेणेकरून तुमची मार्क कमी पडणार नाहीत. तसंच गणिताला येणाऱ्या ज्या आकृत्या असतात त्या तुम्ही अतिशय व्यवस्थित काढल्या पाहिजेत. बारीक पेन्सिलचा वापर केला पाहिजे आणि कुठली घाई गडबड न करता आकृत्या काढाव्यात. आलेख देखील व्यवस्थित रित्या काढावा.
advertisement
पहिला दुसरा आणि तिसरा प्रश्न जो असतो पेपरमधला असतो तो विद्यार्थ्यांनी पटकन सोडवून घ्यावा कारण ते सोपे प्रश्न असतात. त्यानंतर इतर प्रश्न सोडवावेत. प्रत्येक वेळेस नवीन प्रश्न लिहिते वेळेस तो नवीन पानावरती सोडवावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी वेळेचं भान ठेवावं.
प्रत्येक प्रश्नासाठी जास्त वेळ देऊ नये. पटपट सर्व प्रश्न सोडवावेत जेणेकरून तुम्हाला सगळा पेपर हा सोडविता येईल आणि कुठलीही गडबड करू नये. अतिशय शांत मनाने पेपर लिहावा. अशा पद्धतीने जर तुम्ही पेपर सोडविला तर तुम्हाला यामध्ये चांगले मार्क मिळतील, असं शिक्षिका दीपा चौधरी यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
February 03, 2025 3:20 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
दहावीच्या विद्यार्थ्यांनो गणिताचं टेन्शन सोडा, या ट्रिक्स वापरून सोडवा पेपर, मिळतील पैकीच्या पैकी गुण

