तुमची मार्कशीट हरवलीये,आता घरबसल्या मिळेल! शाळेत जाण्याची गरजच नाही; फक्त एवढंच करा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
दहावी-बारावीचे मार्कशीट किंवा प्रमाणपत्र हरवल्यास आपल्याला अनेकवेळा विभागीय बोर्डात खेटे मारावे लागतात. परंतु आता सर्वसामान्य नागरिकांच्या या कटकटीतून सुटका होणार आहे.
जालना : अनेकदा आपले महत्त्वाचे कागदपत्रे गहाळ होतात. ऐन वेळेवर सापडत नाहीत. दहावी-बारावीचे मार्कशीट किंवा प्रमाणपत्र हरवल्यास आपल्याला अनेकवेळा विभागीय बोर्डात खेटे मारावे लागतात. परंतु आता सर्वसामान्य नागरिकांच्या या कटकटीतून सुटका होणार आहे.
राज्य मंडळाने ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध करून दिली असून, इच्छुक विद्यार्थी घरी बसूनच अर्ज करू शकतील. आधार क्रमांकावर आधारित ओटीपी प्रमाणीकरणाद्वारे अर्ज सादर करता येणार असून, कोणत्याही प्रकारच्या डुप्लिकेट प्रमाणपत्रासाठी एकसमान 500 शुल्क आकारणार आहे. त्याचा विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. आता दहावी आणि बारावीच्या प्रमाणपत्रांसाठीची सर्व कार्यपद्धती ऑनलाइन पोर्टलद्वारे केली जाणार आहे.
advertisement
डुप्लिकेट मार्कशीट आणि प्रमाणपत्रासाठी आता एकसमान 500 रुपयांचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. पूर्वी अनेक कागदपत्रे, शाळेची शिफारस आणि मंडळातील पडताळणी आवश्यक होती. आता ऑनलाइन अर्ज केल्यानंतर प्रमाणपत्र मिळेल. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राची प्रत घरी पोस्टाद्वारे मिळवण्याची सुविधाहीदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रमाणपत्र हरवणे, नुकसान होणे किंवा दुरुस्तीची आवश्यकता भासल्यास विद्यार्थ्यांना यापुढे कार्यालयात लांब रांगा लावाव्या लागणार नाहीत.
advertisement
ऑनलाइन अर्जासाठी आधार क्रमांकाशी लिंक केलेला मोबाइल क्रमांक अनिवार्य आहे. ओटीपी प्रमाणीकरणानंतर विद्यार्थ्याला नोंद करता येणार आहे. नवीन प्रणालीमध्ये शाळेचे शिफारसपत्र, मुख्याध्यापकाची सही-शिक्का किंवा अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता राहणार नाही. राज्य मंडळाने 1990 सालापासूनचा सर्व निकाल व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक डेटा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे.
advertisement
काय आहे प्रक्रिया?
मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर लॉगीन करणे, आधार ओटीपीद्वारे प्रमाणीकरण, आवश्यक प्रमाणपत्राचा प्रकार निवडणे गरजेचे आहे. माहिती भरून अर्ज सबमिट करणे, ऑनलाइन शुल्कानंतर प्रमाणपत्र डाउनलोड किंवा पोस्टाद्वारे प्राप्त करावे.
विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांसाठी शाळेच्या शिफारसपत्राची अडचण येत होती. ही प्रक्रिया ऑनलाइन केल्यामुळे वेळ आणि त्रास दोन्ही वाचणार असल्याचे जालनाचे शिक्षणाधिकारी मनोज कोल्हे यांनी सांगितले.
Location :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
December 02, 2025 3:32 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
तुमची मार्कशीट हरवलीये,आता घरबसल्या मिळेल! शाळेत जाण्याची गरजच नाही; फक्त एवढंच करा


