आयुष्यात कधीच चित्रपट पाहिला नाही, social media पासूनही राहिला लांब, तरुणानं आज देशात नाव कमावलं!

Last Updated:

प्रियांश प्रांजलने संपूर्ण भारतात 30 वा क्रमांक मिळवून स्वत:ला सिद्ध केले. निकालानंतर त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. त्याच्या या यशानंतर लोकल18 च्या टीमने त्याच्याशी संवाद साधला.

प्रियांश प्रांजल
प्रियांश प्रांजल
शिखा श्रेया, प्रतिनिधी
रांची : नॅशनल टेस्टिंग एजेंसीकडून जेईई मेन्स या अत्यंत कठीण परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत असतात. यामध्ये आता एका विद्यार्थ्याने देशात 30 वा क्रमांक मिळवला आहे. प्रियांश प्रांजल असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
प्रियांश प्रांजल हा झारखंडच्या रांची येथील मोराबादीचा रहिवासी आहे. प्रियांश प्रांजलने संपूर्ण भारतात 30 वा क्रमांक मिळवून स्वत:ला सिद्ध केले. निकालानंतर त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. त्याच्या या यशानंतर लोकल18 च्या टीमने त्याच्याशी संवाद साधला.
advertisement
प्रियांशने लोकल18 शी बोलताना सांगितले की, अभ्यासात सातत्य फार महत्त्वाचे आहे. मी प्रत्येक दिवशी 10 ते 12 तास अभ्यास करायचो. रात्री 2 वाजेपर्यंत मी अभ्यास करायचो. तसेच अभ्यासादरम्यान, 10-15 मिनिटांचा ब्रेकही घ्यायचो. यासोबतच तो म्हणाला की, मी आजपर्यंत एकही चित्रपट पाहिलेला नाही. तसेच मला चित्रपट पाहण्याची कोणतीही आवड नाही. त्यामुळे मला त्या क्षेत्राबाबत अधिक काहीच माहिती नाही.
advertisement
तसेच मी सोशल मीडियापासून एक अंतर ठेवले. इंस्टाग्राम, व्हाट्सअप किंवा मनोरंजनाच्या साधनांपासून मी दूर होतो. तसेच स्ट्रीट फूडपासूनही दूर राहिलो. यामुळे आरोग्य खराब होते. तसेच तुम्ही किती वेळ अभ्यास करतात, यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीने गोष्टी समजून घेतात, हे फार महत्त्वाचे आहे.
advertisement
तसेच उजळणी करणे खूप महत्वाचे आहे. सराव आणि उजळणी सातत्याने करत राहाव्यात. आता माझे पुढचे ध्येय हे JEE Advanced या परीक्षेवर आहे. या परिक्षेतही मी यश मिळवण्यासाठी मी पूर्ण तयारी करेन, असे तो म्हणाला. माझे रोल मॉडल माझे वडील आहेत. ते ज्या पद्धतीने मेहनत करतात, प्रामाणिकपणे सिव्हिल कोर्टात आपले काम करतात, ते पाहून मी प्रभावित आहेत. त्यांनी प्रत्येक प्रसंगात मला साथ दिली आहे, असे तो म्हणाला.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
आयुष्यात कधीच चित्रपट पाहिला नाही, social media पासूनही राहिला लांब, तरुणानं आज देशात नाव कमावलं!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement