टेस्लामध्ये नोकरीची संधी! पगारही लाखो रुपये, मुंबई-पुण्यासाठी कुठे करायचा अर्ज?

Last Updated:

टेस्लाने मुंबईत नवीन शोरुम सुरू केले आहे आणि नोकऱ्यांसाठी संधी उपलब्ध केल्या आहेत. इंजिनियरिंग, सेल्स, कस्टमर केअर आणि ऑपरेशन्स विभागात भरती सुरू आहे. पगार आकर्षक आहे.

News18
News18
नुकतंच टेस्लानं मुंबईत आपलं नवीन शोरुम सुरू केलं आहे. दिल्ली, गुरुग्राम पाठोपाठ आता मुंबई पुण्यातील नागरिकांना टेस्लाच्या गाड्या या शो रुममधून घेता येणार आहेत. मुंबईत फक्त शोरुमच आलं नाही तर त्यासाठी नोकऱ्यांसाठी संधी देखील टेस्ला घेऊन आलं आहे. गलेलठ्ठ पगार, परदेशात फिरण्याची संधी अशी स्वप्न तुम्ही पाहात असाल तर ही नोकरी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. का काय विचारता, कारण टेस्लाने भारतात वेगवेगळ्या ठिकाणी भरती असल्याची जाहिरात आणली आहे.
कोणत्या पोस्टसाठी भरती?
एलन मस्क यांच्या कंपनीसोबत काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. मुंबई, दिल्ली, पुणे आणि बंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये टेस्लाने आपले कार्यालय सुरू केले असून, जोरदार नोकरभरती प्रक्रियाही सुरू झाली आहे. इंजिनियरिंग, सेल्स, कस्टमर केअर आणि ऑपरेशन्स या विभागांसाठी ही संधी असणार आहे.
मार्केट रेटपेक्षा जास्त पगार
टेस्ला ही कंपनी केवळ त्यांच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठीच नाही, तर कर्मचाऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या आकर्षक पगारासाठी आणि इतर फायद्यांसाठीही ओळखली जाते. कंपनी भारतीय बाजारपेठेतील सरासरी पगारापेक्षा किमान १०% जास्त पगार देत असल्याचा अंदाज आहे. पगार उमेदवाराची भूमिका, अनुभव आणि नोकरीच्या ठिकाणावर अवलंबून असतो.
advertisement
Entry-Level:
फ्रेशर्स आणि कमी अनुभव असलेल्या तरुणांसाठी टेस्ला सल्लागार, ग्राहक सेवा विशेषज्ञ (Customer Support Specialist), ऑटोपायलट वाहन ऑपरेटर यांसारखी पदे उपलब्ध आहेत. यासाठी बॅचलर पदवी किंवा डिप्लोमा असणे पुरेसे आहे. या पदांसाठी वार्षिक 3 लाख ते 14.4 लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. ऑटोपायलट ऑपरेटरला तासाला 300 ते 600 रुपये मिळणार आहेत. रात्रीच्या शिफ्टसाठी 10% अतिरिक्त भत्ता दिला जाईल.
advertisement
Mid-Level:
Service Technician, Inside Sales Advisor, Business Operations Analyst यांसारख्या अनुभवी पदांसाठी चांगली संधी आहे. त्यांच्या अनुभवानुसार 6 लाखांपासून ते 20 लाख रुपयांपर्यंत पगारवाढ मिळणार आहे.
Senior-Level:
Managerial Positions, Service Manager, Store Manager, Customer Engagement Manager या पदांवर भरती करत आहे. अनुभवी व्यावसायिकांना वार्षिक 20 लाख ते 60 लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो, ज्यामुळे हे पगार भारतीय बाजारपेठेतील उच्च श्रेणीतील आहेत.
advertisement
इंटर्नशिपचीही संधी
पगारासोबतच टेस्ला आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक अतिरिक्त फायदे देणार आहे. यामध्ये मेडिक्लेम, स्टॉक पर्याय (RSU) आणि आकर्षक बोनस यांचा समावेश आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षा अधिक मजबूत होते. टेस्लाचा 'START' कार्यक्रम आणि इंटर्नशिप फ्रेशर्सना टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही भूमिकांमध्ये कामाचा अनुभव घेण्यासाठी एक उत्तम संधी देत आहे. त्यामुळे ज्यांना इंटर्नशिप करायची आहे त्यांनाही इथे संधी मिळणार आहे.
advertisement
कसा करायचा अर्ज?
टेस्लामध्ये नोकरीच्या संधी शोधणाऱ्यांनी त्यांच्या अधिकृत करिअर पेज tesla.com/careers ला भेट द्या. https://hire-r1.mokahr.com/social-recruitment/tesla/100004142#/ या थेट लिंकवर भेट देऊन या नोकरी संदर्भातील डिटेल्स तपासू शकता. टेस्लाचे भारतात आगमन हे केवळ इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठीच नाही, तर देशातील लाखो तरुणांसाठी नोकरीच्या नव्या संधी घेऊन येणार आहे.
मराठी बातम्या/करिअर/
टेस्लामध्ये नोकरीची संधी! पगारही लाखो रुपये, मुंबई-पुण्यासाठी कुठे करायचा अर्ज?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement