UPSC CSE Result : परीक्षेचा निकाल जाहीर, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला

Last Updated:

UPSC CSE Result : 4 जानेवारी 2024 ते 9 एप्रिल 2024 या कालावधीत UPSC द्वारे मुलाखतीचे आयोजन करण्यात आलं होतं. मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

यूपीएससीचा निकाल जाहीर
यूपीएससीचा निकाल जाहीर
नवी दिल्ली : UPSC CSE परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत एकूण एक हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. 4 जानेवारी 2024 ते 9 एप्रिल 2024 या कालावधीत UPSC द्वारे मुलाखतीचे आयोजन करण्यात आलं होतं. आदित्य श्रीवास्तव UPSC CSE 2023 परीक्षेमध्ये भारतात पहिला आला आहे.
आदित्य श्रीवास्तचं देशभरात कौतुक होत आहे. सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. मागच्या दोन परीक्षांच्या तुलनेत या परीक्षेत मात्र मुलींना बाजी मारता आली नाही. पहिल्या दहामध्ये फक्त तीन मुलींच्या नावांचा समावेश आहे. तुम्ही UPSC चा संपूर्ण निकाल UPSC च्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तिथे तुम्हाला संपूर्ण यादी आणि तुमचे मार्क पाहता येणार आहेत.
advertisement
UPSC CSE 2023 टॉप 10 नावे
अनिमेश प्रधान
दोनुरु अनन्या रेड्डी
पी. के सिद्धार्थ रामकुमार
रुहानी
सृष्टी डबास
अनमोल राठोड
आशीष कुमार
नौशीन
ऐश्वर्याम प्रजापती
कोण आहे आदित्य श्रीवास्तव? (Who is Aditya Srivastava Upsc Topper)
नागरी सेवा परीक्षा २०२३ मध्ये अव्वल आलेला आदित्य श्रीवास्तव (UPSC CSE Topper 2023 Topper Aditya Srivastava) हा लखनौचा रहिवासी आहे आणि त्याने IIT कानपूरमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. आदित्य 2017 पासून नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होता आणि यावर्षी त्याने परीक्षा उत्तीर्ण केली आणि प्रथम क्रमांक मिळविला.
मराठी बातम्या/करिअर/
UPSC CSE Result : परीक्षेचा निकाल जाहीर, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement