कोण आहे Aditya Srivastava? UPSC मध्ये AIR1 रँक मिळवण्यासाठी 2017 पासून केली मेहनत

Last Updated:

UPSC CSE Topper 2023 Aditya Srivastava : युपीएससीच्या परिक्षेचा हिरो हा आदित्य श्रीवास्तव ठरला आहे. त्याने या परीक्षेत पहिल्या क्रमांक मिळवला आहे. म्हणजेच तो AIR 1 रँक ने पास झाला आहे.

कोण आहे UPSC CSE Topper 2023 आदित्य श्रीवास्तव
कोण आहे UPSC CSE Topper 2023 आदित्य श्रीवास्तव
मुंबई : नागरी सेवा परीक्षा (UPSC) चा निकाल मंगळवारी 16 एप्रिलला आला आहे. या परीक्षेत एकूण 1016 जणांनी बाजी मारली आहे. हा निकाल लागल्यानंतर त्याच्या टॉपरबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्याचा इथपर्यंतचा प्रवास, त्याची मेहनत आणि अभ्यास करण्याची पद्धत सगळंच लोकांना जाणून घ्यायचं असतं. एवढच काय तर त्यांची कहाणी सामान्यांसाठी मोटिवेशनल असते.
UPSC च्या परिक्षेचा हिरो हा आदित्य श्रीवास्तव (Aditya Srivastava) ठरला आहे. त्याने या परीक्षेत पहिल्या क्रमांक मिळवला आहे. म्हणजेच तो AIR 1 रँक ने पास झाला आहे. ही कोणतीही साधी गोष्ट नाही. कारण AIR 1 ने पास होणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी अनेक वर्षांचे कष्ट, मेहनत, चिकाटी असणं गरजेचं आहे. त्यामुळे लोकांना आता आदित्य श्रीवास्तव आणि त्याच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायचं आहे.
advertisement
कोण आहे आदित्य श्रीवास्तव? (who is Aditya Srivastava upsc topper)
नागरी सेवा परीक्षा २०२३ मध्ये अव्वल आलेला आदित्य श्रीवास्तव (UPSC CSE Topper 2023 Topper Aditya Srivastava) हा लखनौचा रहिवासी आहे आणि त्याने IIT कानपूरमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
आदित्य 2017 पासून नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होता आणि यावर्षी त्याने परीक्षा उत्तीर्ण केली आणि प्रथम क्रमांक मिळविला.
advertisement
आदित्यने सुरुवातीचे शिक्षण लखनऊमधूनच पूर्ण केले. लखनऊमधून 12वी पूर्ण केल्यानंतर आदित्यने आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश घेतला. त्यांने आयआयटी कानपूरमधून बीटेक आणि एमटेक पदव्या मिळवल्या आहेत.
गेल्या वर्षी 236 वा क्रमांक मिळवला
आदित्य श्रीवास्तव यांनी 2022 मध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दिली होती, ज्यामध्ये त्यांला 236 वा क्रमांक मिळाला होता. आदित्यच्या पश्चात आई-वडील आणि एक बहीण आहे.
advertisement
आदित्यच्या दैनंदिन दिनचर्येबद्दल सांगायचे तर तो दररोज 14 तास अभ्यास करायचा. आदित्यच्या आईच्या म्हणण्यानुसार तो सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत अभ्यास करायचा.
आपल्या शालेय दिवसांचा किस्सा सांगताना आदित्यने सांगितले होते की लहानपणी त्याला अभ्यास करायला आवडत नसे, ज्यामुळे तो शक्यतो अभ्यास टाळायचा. त्याला क्रिकेटची खूप आवड होती. त्यामुळेच तो अनेकदा अभ्यास सोडून क्रिकेट खेळू लागला. मात्र, जसजसा तो मोठा होत गेला, तसतसे त्याला यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील याची जाणीव झाली. त्यामुळे आदित्यने आधी आयआयटी आणि नंतर यूपीएससीची परीक्षाही उत्तीर्ण केली.
मराठी बातम्या/देश/
कोण आहे Aditya Srivastava? UPSC मध्ये AIR1 रँक मिळवण्यासाठी 2017 पासून केली मेहनत
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement