Upsc Result : दोन वर्ष नोकरी मग दिला राजीनामा, साताऱ्याच्या संकेतनं अखेर UPSC परीक्षेत मिळवलं यश, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
संकेत शिंगटे यांनी आपल्या चिकाटी, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर आज लागलेल्या यूपीएससी परीक्षेच्या निकालात देशात 479 वा क्रमांक पटकवला आहे. यशामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यासह त्यांच्या मित्रपरिवारात आणि नातेवाईकांत आनंदाचे वातावरण आहे.
पुणे : अनेक तरुणांचे स्वप्न असलेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होणे हे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक मानले जाते. मात्र सातारा जिल्ह्यातील संकेत शिंगटे यांनी आपल्या चिकाटी, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर आज लागलेल्या यूपीएससी परीक्षेच्या निकालात देशात 479 वा क्रमांक पटकावत ही परीक्षा यशस्वीपणे पार केली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यासह त्यांच्या मित्रपरिवारात आणि नातेवाईकांत आनंदाचे वातावरण आहे.
संकेत यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. मुंबई येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नामांकित आयटी कंपनीमध्ये दोन वर्षे काम केले. नोकरी करत असतानाच त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी सुरू केली आणि त्यानंतर नोकरी सोडून UPSC कडे आपला प्रवास वळवला.
advertisement
घरातूनच अधिकारी होण्याची प्रेरणा मिळालेली असल्याने कधीही हार न मानता सातत्याने अभ्यास करत राहिले. त्यांचे काका पोलीस अधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडूनच त्यांना या क्षेत्राची ओळख आणि प्रेरणा मिळाली.पाच वर्षाच्या सातत्यपूर्ण अभ्यासानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेत हे यश मिळवले आहे. त्यांनी दररोज 8 ते 9 तास नियमित आणि प्रभावी पद्धतीने अभ्यास केला. स्वतःची अभ्यासपद्धती तयार करत, आपली ताकद ओळखून नियोजनबद्ध अभ्यासावर भर दिला.
advertisement
यश मिळवायचं असेल तर स्वःताची क्षमता ओळखा, योग्य स्टॅटर्जी ठरवा आणि चिकाटीने अभ्यास करा. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे यश निश्चितच मिळते, असं संकेत शिंगटे सांगतात. त्यांच्या या यशामुळे साताऱ्याचा अभिमान उंचावला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
April 22, 2025 7:45 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Upsc Result : दोन वर्ष नोकरी मग दिला राजीनामा, साताऱ्याच्या संकेतनं अखेर UPSC परीक्षेत मिळवलं यश, Video