UPSC 2024 : वडील प्रिंटिंग प्रेसमध्ये तर आई गृहिणी, क्लासेस न लावता मानखुर्दच्या सृष्टीनं UPSC पास करून दाखवलं! Video

Last Updated:

UPSC Result : आज जाहीर झालेल्या UPSC 2024 च्या निकालात देशभरातून अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलं असून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही आपली चमक दाखवली आहे. मुंबईच्या मानखुर्द येथील सृष्टी सुरेश कुळयेने देशात 831 वा क्रमांक मिळवत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

+
UPSC

UPSC 2024 परीक्षेत मानखुर्दच्या सृष्टी कुळयेची बाजी

मुंबई : आज जाहीर झालेल्या UPSC 2024 च्या निकालात देशभरातून अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलं असून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही आपली चमक दाखवली आहे. या परीक्षेत पुण्याच्या अर्चित डोंगरेने देशात तिसरा क्रमांक पटकावला, तर ठाण्याच्या तेजस्वी देशपांडेला 99 वा क्रमांक आणि अंकिता पाटीलला 303 वा क्रमांक मिळाला आहे. याशिवाय मुंबईच्या मानखुर्द येथील सृष्टी सुरेश कुळयेने देशात 831 वा क्रमांक मिळवत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
सृष्टीचं यश अधिकच उल्लेखनीय ठरतं कारण तिनं कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता फक्त लायब्ररीमध्ये बसून अभ्यास केला. ती दिवसातून 12 ते 14 तास सातत्याने अभ्यास करत असे. ती रामनारायण रुईया कॉलेजमधून आर्ट्समध्ये पदवीधर असून, हा तिचा UPSC चा दुसरा प्रयत्न होता. दहावीला तिला 92 टक्के गुण मिळाले होते.
advertisement
सृष्टीचे वडील प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करतात तर आई गृहिणी आहे. मानखुर्दच्या शिवशक्ती चाळीत वाढलेल्या सृष्टीला एम. पवार लायब्ररीत मिळालेल्या अभ्यासाच्या शांततेने आणि पालकांच्या पाठिंब्याने हे यश मिळवता आलं, असं ती नमूद करते.
आपली लेक परीक्षा पास झाली, या आनंदाचे अश्रू सृष्टीच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होते. हे दृश्य कुणाच्याही डोळ्यांत पाणी आणणारे होतं. आज 25 वर्षांची सृष्टी जेव्हा कामावर रुजू होईल, तेव्हा आपल्या सारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी काम करणं, ही तिची प्राथमिकता असेल असं ती सांगते. तिचं हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
UPSC 2024 : वडील प्रिंटिंग प्रेसमध्ये तर आई गृहिणी, क्लासेस न लावता मानखुर्दच्या सृष्टीनं UPSC पास करून दाखवलं! Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement