Education Loan : 12वीनंतर मुलीला परदेशात शिक्षणासाठी पाठवायचंय? फॉरेन एज्युकेशन लोनसाठी असं करा अप्लाय
- Published by:Pooja Jagtap
- trending desk
Last Updated:
महाराष्ट्रातही 12 वीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. तुम्हाला तुमच्या मुलीला परदेशात शिक्षणासाठी पाठवायचं आहे का? याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला त्यासाठी मोठा खर्च येईल.
मुंबई : एकामागून एक राज्यातून दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर होत आहेत. महाराष्ट्रातही 12 वीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. तुम्हाला तुमच्या मुलीला परदेशात शिक्षणासाठी पाठवायचं आहे का? याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला त्यासाठी मोठा खर्च येईल. त्यासाठी तुम्हाला एज्युकेशन लोन घ्यावं लागू शकतं. आज भारतात उपलब्ध असलेल्या अशा एज्युकेशन लोनबद्दल जाणून घेऊया जे अभ्यास व प्रवासातील विविध खर्च हाताळतात.
कमी व्याजदरात एज्युकेशन लोन देणाऱ्या बँकांच्या अनेक योजना आहेत, त्यापैकी तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवडू शकता. परदेशी होम लोन अंतर्गत येणाऱ्या खर्चामध्ये ट्युशन फी, राहण्याचा खर्च आणि लॅपटॉप किंवा पुस्तकांची खरेदी, फ्लाईट तिकिटांसारख्या खर्चांचा समावेश आहे. फॉरेन एज्युकेशन लोनसाठी वित्तीय संस्था शॉर्टलिस्ट करताना, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी अनेक महत्त्वाच्या घटकांचा विचार केला पाहिजे. त्यात कोणती बँक किती व्याजदर देत आहे, लोन रिक्वेस्ट प्रोसेसिंग फी, त्यासाठी लागणारा वेळ, लोन टेन्युअर व प्री-पेमेंटच्या अटी या गोष्टींचा समावेश आहे. 'बँक बाजार डॉट कॉम'च्या आकडेवारीनुसार, सात वर्षांसाठी 50 लाख रुपयांपर्यंतचे एज्युकेशन लोन 13.7 टक्के पेक्षा कमी व्याजदराने देणाऱ्या टॉप 10 बँका खालीलप्रमाणे आहेत.
advertisement
स्टेट बँक ऑफ इंडिया फॉरेन एज्युकेशन लोनवर 11.15 टक्क्यांपासून व्याज आकारते. इतर अनेक बँकांच्या तुलनेत हे प्रमाण थोडे जास्त आहे. सात वर्षांच्या कालावधीसाठी 50 लाख रुपयांच्या लोनसाठी ईएमआय 86,007 रुपये असेल.
एचडीएफसी बँक 12.50 टक्के व्याज दराने लोन देते. सात वर्षांसाठी 50 लाख रुपयांच्या लोनवरील ईएमआय 89,606 रुपये असेल.
advertisement
इंडियन बँकेचे फॉरेन एज्युकेशन लोनवर व्याजदर 8.6 टक्क्यांपासून सुरू होतात. सात वर्षांच्या कालावधीसाठी 50 लाख रुपयांच्या लोनवरील ईएमआय 79,435 रुपये आहे.
अॅक्सिस बँक 13.7 टक्के व्यादराने फॉरेन एज्युकेशन लोन देते. सात वर्षांच्या कालावधीसाठी 50 लाखांच्या लोनवर 92,873 रुपये ईएमआय भरावा लागतो.
बँक ऑफ इंडिया फॉरेन एज्युकेशन लोनवर 11.85 टक्क्यांपासून सुरू होणारे व्याजदर ऑफर करते. सात वर्षांच्या कालावधीसाठी 50 लाख रुपयांच्या अशा लोनवर ईएमआय 87,863 रुपये भरावा लागतो.
advertisement
युनियन बँक ऑफ इंडिया फॉरेन एज्युकेशन लोनवर 9.25 टक्क्यांपासून व्याज आकारते. सात वर्षांसाठी 50 लाख रुपयांच्या लोनवर ईएमआय 81,081 रुपये असतो.
बँक ऑफ बडोदा फॉरेन एज्युकेशन लोनवर 9.7 टक्क्यांपासून सुरू होणारे व्याजदर आकारते. यामध्ये सात वर्षांसाठी 50 लाख रुपयांच्या लोनवरील ईएमआय 82,233 रुपये असेल.
advertisement
आयसीआयसीआय बँक आणि पंजाब नॅशनल बँक या दोन्ही फॉरेन एज्युकेशन लोनवर 10.25 टक्क्यांपासून व्याजदर आकारतात. सात वर्षांच्या कालावधीसाठी अशा 50 लाख रुपयांच्या कर्जावरील ईएमआय 83,653 रुपये असतो.
कॅनरा बँक फॉरेन एज्युकेशन लोनवर 10.85 टक्के व्याज आकारते. सात वर्षांसाठी 50 लाख रुपयांच्या कर्जावरील ईएमआय 85,218 रुपये असेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 21, 2024 2:48 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Education Loan : 12वीनंतर मुलीला परदेशात शिक्षणासाठी पाठवायचंय? फॉरेन एज्युकेशन लोनसाठी असं करा अप्लाय


