Job Alert: 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत बंपर नोकऱ्या, 3 हजारांपेक्षा जास्त जागांवर भरती
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Railway Sarkari Naukri : भारतीय रेल्वेमध्ये 10 वी आणि आयआयटी पाससाठी बंपर भरती काढण्यात आलीआहे. यासाठी 15 वर्षे वय असणारे देखील फॉर्म भरु शकतात. चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती...
Railway Sarkari Naukri : 10 वी ITI करुन तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर रेल्वेमध्ये तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वे झोनच्या रिक्रूटमेंट सेलने 3000 पेक्षा अधिक रिक्त जागांवर भरती करण्याची अधिसूचना जारी केली आहे. पश्चिम मध्य रेल्वेने आपल्या अधिसूचनेत सांगितलं की, अपरेंटिसशिप ट्रेनिंगसाठी 3015 व्हॅकेंसीज आहेत. रेल्वेमध्ये अपरेंटिसशिप ट्रेनिंगसाठी विविध पदांवर भरती होणार आहे. अधिकांश कंपन्यांमध्ये फक्त आयटीआय पास झाल्यावर जॉब मिळत नाही. यानंतर अपरेंटिसशिपही केलेलं असणं गरजेचं असतं. अशावेळी भारतीय रेल्वेमध्ये अपरेंटिसशिप ट्रेनिंगची शानदार संधी आहे. या वर्षीच्या अपरेंटिसशिप दरम्यान दरमहा स्टायपेंड देखील मिळणार आहे.
पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अपरेंटिसशिप ट्रेनिंगसाठी अर्ज शुल्क रुपये 100 + रुपये 36 प्रक्रिया फीस म्हणजेच 136 रुपये आहे. मात्र, SC/ST/PWD आणि महिला उमेदवारांना केवळ 36 रुपये प्रोसेसिंग फीस भरावी लागेल. अॅप्लीकेशन फी ऑनलाइन पद्धतीने भरावी लागेल. 15 डिसेंबर 2023 पासून अप्रेंटिसशिप भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2024 आहे.
advertisement
ट्रेड अपरेंटिसशिपसाठी वयोमर्यादा
- किमान वय 15 वर्षे
-कमाल वय 24 वर्षे
- आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट मिळेल.
ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी किती शिक्षण घेतले पाहिजे?
ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी, एखाद्याने 10वी उत्तीर्ण केलेली असावी आणि ज्या ट्रेडमध्ये NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून शिकाऊ प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यामध्ये ITI केलेले असावे.
advertisement
पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अपरेंटिसशिप व्हॅकेंसी
निवड कशी होईल?
पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अपरेंटिसशिप ट्रेनिंगसाठी सिलेक्शन मेरिटच्या आधारावर होईल. जे 10वीचे अॅव्हरेज मार्क्स आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केले जाईल.
अर्ज कसा करायचा?
पश्चिम मध्य रेल्वेची वेबसाइट https://www.wcr.indianrailways.gov.in/ वर जाऊन ऑनलाईन मोडवर अर्ज करायचा आहे. पश्चिम मध्य रेल्वेच्या या वेबसाइटला ओपन करुन about us->Recruitment->Railway Recruitment Cell->Engagement of Act Apprentices for 2023-24 वर जाऊन अर्ज करावा लागेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2023 8:37 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
Job Alert: 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत बंपर नोकऱ्या, 3 हजारांपेक्षा जास्त जागांवर भरती