Polytechnic Admission : पॉलिटेक्निकला प्रवेश घ्यायचाय? कागदपत्रे आणि प्रक्रिया माहितीये का? पाहा संपूर्ण माहिती एका क्लिक वर
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
दहावी आणि बारावीनंतर अनेक जण अभियांत्रिकीला प्रवेश घेतात. पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्यासाठी काय प्रक्रिया असते आणि कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात? जाणून घ्या.
जालना : इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचे वेध लागले आहेत. दहावी आणि बारावीनंतर अनेक जण अभियांत्रिकीला प्रवेश घेतात. पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्यासाठी काय प्रक्रिया असते आणि कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात? याबद्दलचं आपल्याला जालना शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य एन. आर. जवाडे यांनी माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये कॅप अंतर्गत एकूण 1 लाख 18 हजार पॉलिटेक्निकच्या जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी 16 जून पर्यंत अर्ज करण्याची मुदत असणार आहे. कागदपत्रे पडताळणी ते अर्ज निश्चिती प्रक्रिया 16 जून पर्यंत होणार आहे. यानंतर 18 जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. तर अंतिम गुणवत्ता यादी ही 23 जून रोजी प्रसिद्ध होईल.
advertisement
दरवर्षी तीन फेऱ्यांमध्ये प्रवेश निश्चित केले जायचे. यांना चार फेऱ्यांमध्ये प्रवेश निश्चिती होणार आहे. यावर्षी पहिल्या फेरीमध्ये पहिला पर्याय ऑटो फ्रीज होणार आहे. दुसऱ्या फेरीमध्ये पहिले तीन पर्याय ऑटो फ्रीज होणार आहेत. तर तिसऱ्या फेरीमध्ये पहिले सहा पर्याय ऑटो फ्रीज होणार आहेत. तीन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर काही जागा शिल्लक राहिल्यास संस्थात्मक पातळीवर समुपदेशन करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील.
advertisement
आवश्यक कागदपत्रे
दहावी किंवा बारावीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टीसी, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस किंवा एसइबीसी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
जालना जिल्ह्यामध्ये दोन शासकीय तर तीन खाजगी पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. यामध्ये एकूण 1800 विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. अकराशे विद्यार्थ्यांना अंबड आणि जालना येथील शासकीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळतील. तर तीन खाजगी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये 700 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचे जालना येथील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य एन. आर. जवाडे यांनी सांगितले. विद्यार्थिनींना पॉलिटेक्निकसाठी प्रवेश फी माफ करण्यात आली असून विद्यार्थ्यांना देखील वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीला प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्राचार्य जवाडे यांनी केले आहे.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
May 27, 2025 5:09 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Polytechnic Admission : पॉलिटेक्निकला प्रवेश घ्यायचाय? कागदपत्रे आणि प्रक्रिया माहितीये का? पाहा संपूर्ण माहिती एका क्लिक वर

