मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही? हे करा 3 उपाय, वाढेल एकाग्रता, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
आजकालच्या मुलांचे अभ्यासात अजिबात लक्ष लागत नाही, अशी तक्रार जवळपास प्रत्येक पालक करत असतो. परीक्षा जवळ आल्यावर तर ही चिंता अधिकच वाढते.
.नाशिक : आजकालच्या मुलांचे अभ्यासात अजिबात लक्ष लागत नाही, अशी तक्रार जवळपास प्रत्येक पालक करत असतो. परीक्षा जवळ आल्यावर तर ही चिंता अधिकच वाढते. मुले अभ्यास करत नाहीत, केलेला अभ्यास लक्षात ठेवत नाहीत आणि त्यांची एकाग्रता कमी आहे, अशा समस्या अनेक पालक बोलून दाखवतात. तुमच्या मुलाचे अभ्यासात लक्ष लागावे, त्याने केलेला अभ्यास त्याच्या लक्षात राहावा आणि परीक्षेत त्याने चांगले गुण मिळवावे यासाठी नाशिक येथील अंकशास्त्र तज्ज्ञ विभा घावरे यांनी अंकशास्त्राच्या आधारावर काही प्रभावी उपाय सुचवले आहेत.
अंक ३, ५, ७ चे महत्त्व काय?
न्यूमरॉलॉजीनुसार, मुलांच्या जन्म तारखेत ३, ५, ७ हे अंक असणे अभ्यासासाठी महत्त्वाचे मानले जाते.
• अंक ३ (गुरू ग्रह): हा अंक गुरू ग्रहाचा आहे. मुलांचे शिक्षणात लक्ष लागत नसेल, तर अंक ३ ला ऊर्जित केल्याने फायदा होतो.
• अंक ५ (बुध ग्रह - संप्रेषण): हा अंक 'कम्युनिकेशन' (संप्रेषण) वाढवणारा आहे.
advertisement
• अंक ७ (केतू ग्रह): हा अंक लक्ष केंद्रित करण्यासाठी (एकाग्रता) मदत करतो.
या तिन्ही अंकांचा तुमच्या मुलाच्या जन्म तारखेत समावेश असल्यास, त्यांची एकाग्रता कमी वाटल्यास त्यांना ऊर्जित करणे गरजेचे आहे. तसेच, ज्या मुलांच्या जन्म तारखेत हे अंक नसतील, त्यांनी काही सोपे उपाय करून एकाग्रता वाढवता येते.
advertisement
जन्म तारखेत ३, ५, ७ अंक नसल्यास हे उपाय करा
जर हे अंक तुमच्या मुलांच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये सक्रिय नसतील, तर खालील उपाय केल्यास नक्कीच फरक पडेल:
• स्वच्छता आणि क्लियर कॉड
• मुले जिथे अभ्यासाला बसतात, ती जागा किंवा टेबल नेहमी स्वच्छ असावे.
• त्या ठिकाणी क्लियर कॉड (Clear Quartz) चा छोटा चेंडू ठेवावा. यामुळे मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते.
advertisement
• देवतांचे आशीर्वाद
• मुलांकडून सकाळी देवी सरस्वतीचा मंत्र म्हणून घ्यावा.
• अभ्यासाला बसण्यापूर्वी बुद्धीचे देवता असलेल्या श्रीगणपती बाप्पाचे दर्शन घ्यावे. यामुळे अभ्यास करण्यासाठी मनात प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते.
अंकांसाठी विशिष्ट उपाययोजना:
ज्या विद्यार्थ्यांच्या जन्म तारखेत ३, ५, ७ हे अंक नसतील, त्यांनी खालील विशिष्ट उपाय केल्यास अभ्यासात आवड निर्माण होऊन एकाग्रता वाढेल:
advertisement
• अंक ३ (गुरूसाठी):
• हा अंक गुरू ग्रहाशी संबंधित असल्याने, जन्म तारखेत ३ अंक नसल्यास मुलांच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावावा. यामुळे मुले एकाग्र होऊन अभ्यास करतील.
• अंक ५ (बुधासाठी):
• हा अंक बुधाशी जोडलेला आहे. जर तुमच्या मुलाचे कम्युनिकेशन (बोलणे, व्यक्त होणे) कमी असेल किंवा त्याला बोलताना अडचणी येत असतील, तर त्याने बुधवारी हिरव्या पालेभाज्या खाणे गरजेचे आहे.
advertisement
अंकशास्त्र तज्ज्ञ विभा घावरे यांनी सांगितले आहे की, हे सोपे उपाय मुलांच्या दैनंदिन जीवनात केल्यास नक्कीच त्यांच्या शिक्षणावर सकारात्मक परिणाम होतो.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
December 17, 2025 6:38 PM IST








