Printed T-Shirts : ट्रेंडिंग प्रिंटेड टी-शर्ट्स, मिळतायत फक्त 350 रुपयांपासून, मुंबईत हे आहे लोकेशन
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
कमी किमतीत दर्जेदार कापड, टिकाऊ प्रिंट आणि आकर्षक डिझाईन्स ही या शॉपची खास ओळख बनली आहे.
मुंबई : दहिसर परिसरातील कलावंत प्रोडक्शन हे फॅशनप्रेमींसाठी सध्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. ट्रेंडिंग आणि स्टायलिश प्रिंटेड टी-शर्ट्स, टोट बॅग्स, पाऊचेस तसेच हिवाळ्यासाठी खास हुडीज येथे अतिशय परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कमी किमतीत दर्जेदार कापड, टिकाऊ प्रिंट आणि आकर्षक डिझाईन्स ही या शॉपची खास ओळख बनली आहे.
कलावंत प्रोडक्शनचे प्रिंटेड टी-शर्ट्स युवकांपासून ते फॅशनप्रेमी ग्राहकांपर्यंत सर्वांच्याच पसंतीस उतरत आहेत. विशेष म्हणजे सेलिब्रिटींपासून सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत अनेकजण हे टी-शर्ट्स परिधान करताना दिसत असल्यामुळे या ब्रँडची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या बिग बॉस मराठी या लोकप्रिय शोमध्ये सूरज चव्हाण, पंढरीनाथ कांबळे आणि इतर स्पर्धकांनी देखील कलावंत प्रोडक्शनचे टी-शर्ट्स परिधान केल्याचे पाहायला मिळाले, ज्यामुळे ब्रँडला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे.
advertisement
या ट्रेंडी प्रिंटेड टी-शर्ट्सची किंमत केवळ 350 रुपयांपासून सुरू होते. लहान मुलांसाठी टी-शर्ट्सची किंमत 350 ते 400 रुपये असून मोठ्यांसाठी 450 ते 500 रुपयांपर्यंत आहे. तसेच ट्रेकिंगप्रेमींसाठी“प्रेम म्हणजे सह्याद्री या ओळीचा खास डिझाईन असलेला टी-शर्टही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या टी-शर्टमध्ये 1 वर्षापासून ते 42-48 नंबर पर्यंत साईझ अव्हेलेबल आहे. सध्या लग्नसराई सुरू असल्याने कपल्ससाठी प्री-वेडिंग शूटसाठी मॅचिंग टी-शर्ट्सचीही खास सोय येथे करण्यात आली आहे.
advertisement
यासोबतच विविध प्रिंट्स असलेल्या प्रीमियम कापडातील टोट बॅग्स केवळ 300 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. हिवाळ्यासाठी जेन-झी टोनमधील स्टायलिश हुडीजही येथे मिळत आहेत. दहिसर स्टेशनच्या अगदी समोर असलेले हे शॉप ग्राहकांसाठी सहज उपलब्ध असून ऑनलाइन ऑर्डर आणि कस्टमाइज्ड डिझाईन्सचीही सुविधा येथे दिली जाते. कमी किमतीत स्टायलिश आणि दर्जेदार पर्याय उपलब्ध करून देणारे कलावंत प्रोडक्शन हे निश्चितच फॅशनप्रेमींसाठी एक नवे आकर्षण ठरत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 3:39 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Printed T-Shirts : ट्रेंडिंग प्रिंटेड टी-शर्ट्स, मिळतायत फक्त 350 रुपयांपासून, मुंबईत हे आहे लोकेशन









