Railway Food: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता ट्रेनमध्येच मिळणार आवडीच्या हॉटेलचं जेवण; नेमकी प्रोसेस काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
Railway Food: रेल्वेनं प्रवास करताना आता जेवण डोकेदुखी ठरणार नाही. तुमच्या आवडत्या हॉटेलचं जेवण प्रवासात देखील मिळणार आहे.
पुणे: रेल्वेने प्रवास करताना जेवणाचा प्रश्न प्रवाशांसाठी अनेकदा डोकेदुखी ठरतो. रेल्वेतील पँट्री कारचे मर्यादित पर्याय, दर्जाबाबतच्या तक्रारी किंवा वेळेवर जेवण न मिळण्याची अडचण लक्षात घेता, आता भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक दिलासादायक सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून दिली आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) मार्फत सुरू असलेली ई-कॅटरिंग सेवा आता देशभरातील प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
या सेवेमुळे प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान आपल्या आवडीच्या व नामांकित हॉटेल, रेस्टॉरंटमधून थेट जागेवर जेवण मागवता येणार आहे. प्रवाशांनी ठराविक स्थानकासाठी आगाऊ ऑर्डर दिल्यास संबंधित स्थानकावर ट्रेन थांबताच गरम, स्वच्छ व दर्जेदार जेवण थेट त्यांच्या सीटवर पोहोचवले जाते.
advertisement
IRCTC ने प्रवाशांच्या सोयीसाठी www.ecatering.irctc.co.in ही स्वतंत्र वेबसाइट तसेच ‘फूड ऑन ट्रॅक’ मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय टोल-फ्री क्रमांकाच्या माध्यमातूनही जेवणाची ऑर्डर देता येते. प्रवाशांना आपल्या पीएनआर क्रमांकाच्या आधारे उपलब्ध हॉटेल्स, मेन्यू, दर आणि डिलिव्हरी स्थानकांची माहिती मिळते.
शाकाहारी, मांसाहारी ते स्थानिक पदार्थांचा आस्वाद
ई-कॅटरिंग सेवेमध्ये प्रवाशांना भारतीय, दक्षिण भारतीय, चायनीज, कॉन्टिनेंटल तसेच विविध स्थानिक खास पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. पुणे, मुंबई, दिल्लीसह देशातील 300 हून अधिक रेल्वे स्थानकांवर ही सेवा उपलब्ध असून नामांकित ब्रँड्स व स्थानिक लोकप्रिय हॉटेल्सचा यात समावेश आहे.
advertisement
कॅश ऑन डिलिव्हरी व प्री-पेड पर्याय
view commentsप्रवाशांसाठी प्री-पेड तसेच कॅश ऑन डिलिव्हरी हे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे ऑनलाइन पेमेंट करण्यात अडचण असलेल्या प्रवाशांनाही ही सेवा सहज वापरता येते. अन्नाच्या गुणवत्तेबाबत तक्रार असल्यास IRCTC कडून त्वरित दखल घेतली जाते, असेही सांगण्यात आले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 17, 2025 1:35 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Railway Food: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता ट्रेनमध्येच मिळणार आवडीच्या हॉटेलचं जेवण; नेमकी प्रोसेस काय?










