Elon Musk देणार तासाला 5,500 रुपये सॅलरी, फक्त हे काम करावं लागेल, या स्किलची आहे आवश्यकता

Last Updated:

Elon Musk च्या xAI कंपनीने भारतात हिंदी-इंग्रजी भाषेतील ट्यूटरसाठी नोकरीची संधी जाहीर केली आहे. या नोकरीत प्रति तास 35 ते 65 डॉलर्स (5,500 रुपये) कमवू शकता. यासाठी उमेदवारांना लेखन, संशोधन आणि भाषांतर कौशल्य असणे आवश्यक आहे.

+
News18

News18

xAI Tutor India : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर X (पूर्वी ट्विटर) कंपनीचे मालक एलन मस्क यांचीही संपत्ती खूप वाढली आहे. मस्क सतत चर्चेत असतात. यावेळी ते नोकरीच्या ऑफर्सने बातम्यांच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. खरंतर मस्क यांची कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी xAI भारतात हिंदी आणि इंग्रजी भाषेत कुशल द्विभाषिक ट्यूटर्सची भरती करत आहे. या नोकरीत ट्यूटरला तासाला 35 ते 65 डॉलर म्हणजेच सुमारे 5,500 रुपये कमवण्याची संधी मिळणार आहे.
काय आवश्यक आहे?
xAI मध्ये या ट्यूटर्सची काम असेल की, गुणवत्ता सुधारणे, डेटा लेबलिंग करणे आणि भाषिक मॉडेल सुधारणे. या पदासाठी उमेदवारांना तांत्रिक लेखन, पत्रकारिता किंवा व्यावसायिक लेखन या क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे, जेणेकरून ते AI मॉडेलसाठी आवश्यक डेटा अचूकपणे तयार करू शकतील.
संशोधन कौशल्य देखील महत्वाचे
उमेदवारांकडे मजबूत संशोधन कौशल्य देखील असावे. xAIचा विश्वास आहे की ही ट्यूटर टीम हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त कोरियन, चीनी, जर्मन, फ्रेंच, अरबी आणि स्पॅनिश या भाषांत काम करू शकेल. या नोकरीबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही xAI च्या अधिकृत वेबसाइटच्या करियर सेक्शनला भेट देऊ शकता. लेखन, संशोधन आणि द्विभाषिक संवादात पारंगत असलेल्या व्यावसायिकांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
advertisement
पूर्वीही अशीच नोकरीची ऑफर देण्यात आली होती
नोंद घेण्यासारखे आहे की पूर्वीही xAI ने आपल्या ह्यूमनॉइड रोबोट ऑप्टिमसला प्रशिक्षित करण्यासाठी लोकांना भरती केले होते, ज्यामध्ये तासाला 48 डॉलर म्हणजेच सुमारे 4,000 रुपये पगार दिला जात होता. या नोकरीत लोक दररोज सुमारे 28,000 रुपये पर्यंत कमावू शकत होते.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Elon Musk देणार तासाला 5,500 रुपये सॅलरी, फक्त हे काम करावं लागेल, या स्किलची आहे आवश्यकता
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement