एकाच वेळी 6 सरकारी नोकरीत बाजी, तरुणीने कमालंच केली!, काय आहे या यशाचं रहस्य?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
दीक्षा हिने सरकारी वरिष्ठ माध्यमिक विद्यालय, परौर येथून 10वी आणि 12वीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2015-19 या कालावधीत एम्स ऋषिकेशमधून पदवी आणि तसेच 2020-22 या कालावधीत IGMC शिमला येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
शालिका ठाकूर, प्रतिनिधी
कांगडा : जर मनात जिद्द असेल तर कितीही अडचणी असोत व्यक्ती प्रत्येक परिस्थितीवर मात करतो आणि यश मिळवतो. एका तरुणाने हे सिद्ध करुन दाखवले आहे. विशेष म्हणजे या तरुणाने एकाच वेळी 6 सरकारी नोकरीत यश मिळवले आहे. नेमकी कोण आहे तरुणी, तिने हे यश कसे मिळवले, जाणून घेऊयात तिच्या या यशाची प्रेरणादायी कहाणी.
advertisement
दीक्षा कपूर असे या तरुणीचे नाव आहे. ती हिमाचल प्रदेशातील कांगडा तालुक्यातील पालमपूर येथील आरठ झिकली (घिसनपट्ट) गावातील रहिवासी आहे. दिक्षाने एकाच वेळी केंद्र सरकारच्या 6 जागांसाठी निवड होत मोठे यश मिळवले आहे.
दीक्षा हिच्या या यशानंतर आता तिची सर्वत्र चर्चा होत आहे. इतकेच नव्हे तर तिचे अभिनंदन करण्यासाठी तिच्या घरी मोठी गर्दी होत आहे. दीक्षा हिचे वडील धरमचंद कपूर परौरमध्ये दुकान चालवतात. तर आई रैना कपूर आरठ, लाहला व हंगलो वॉर्डच्या माजी पंचायत समिती सदस्य आहेत.
advertisement
यशाचा चढता आलेख -
दीक्षा हिने सरकारी वरिष्ठ माध्यमिक विद्यालय, परौर येथून 10वी आणि 12वीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2015-19 या कालावधीत एम्स ऋषिकेशमधून पदवी आणि तसेच 2020-22 या कालावधीत IGMC शिमला येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, आता दीक्षा हिला बेस हॉस्पिटल आणि कॉलेज दिल्ली येथील नर्सिंग ऑफिसर, केंद्रीय सुरक्षा दल जम्मू फॉरेस्ट याठिकाणी इन्स्पेक्टर आणि एम्स दिल्लीमध्ये नर्सिंग ऑफिसर या पदांसाठी जॉइनिंग लेटर आले आहेत. दीक्षा हिने डॉ. राम मनोहर लोहिया कॉलेज लखनऊ येथील परिक्षेत देशात 5 वी रँक, सीनियर नर्सिंग ऑफिसरच्या परिक्षेत देशात 37 वी रँक आणि एम्स मंग्लागिरी मध्ये नर्सिंग ऑफिसर पदाच्या परिक्षेत देशात 1603 वी रँक मिळवली आहे.
advertisement
दीक्षा कपूर हिने कोणत्या 6 परीक्षा पास केल्या -
1. नर्सिंग ऑफिसर भरती 2024 मध्ये पात्रता परीक्षा
2.मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस लेफ्टनंट रँक परीक्षा
3. CRPF केंद्रीय राखीव पोलीस दल परीक्षा 2020
advertisement
4.AIIMS 2023 डिसेंबर सामान्य भरती पात्रता परीक्षा
5. डॉ. राम लोहिया मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलने नर्सिंग परीक्षेत पाचवा क्रमांक
6. 2023 मध्ये नर्सिंग ऑफिसर भरती सामान्य पात्रता परीक्षा उत्तीर्ण
यशानंतर काय म्हणाली दीक्षा -
advertisement
दीक्षा हिच्या या यशानंतर लोकल18 शी बोलताना तिने सांगितले की, मला अभ्यासाची आवड आहेत. तसेच मी प्रत्येक टॉपिक गंभीरतेने अभ्यासते. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या विषयात मजबूत पकड पकडायला हवी. तसेच एका दिवसात सर्व काही आपण शिकू शकत नाही. त्यामुळे अभ्यासात सातत्य हेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. कोणतीही अडचण तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यापासून रोखणार नाही, असेही तिने सांगितले.
view commentsLocation :
Himachal Pradesh
First Published :
August 30, 2024 2:29 PM IST


