inspiring news : आर्थिक परिस्थितीसमोर न हारता जिद्दीने उभी राहिली; वाचा, तरुणीची प्रेरणादायी कहाणी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
जेव्हापासून मी दहावीमध्ये होती, तेव्हापासून मी हे काम करत होती. आता कॉलेजमध्ये जायला लागली. मी करत असलेल्या कामाच्या माध्यमातून शिक्षणाचा खर्च निघतो आणि घर चालवण्यासाठी मदत होत असल्याचे तिने सांगितले.
राजकुमार सिंह, प्रतिनिधी
वैशाली : बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर येथील सोनाली नावाची तरुणी ही सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने तिच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होता. त्यामुळे तिने आपले शिक्षण पूर्ण होण्यासाठी आणि आपल्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तिने मोठा निर्णय घेतला.
सोनालीने आपले शिक्षण सुरू ठेवण्यासाठी कुणासमोरही हात न पसरवण्याचा निर्णय घेत काहीतरी काम करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सोनालीने दहावीत शिकत असताना शाळा सुटल्यावर दप्तर शिवणे सुरू केले. सोनालीने लहान वयातच पिशव्या शिवण्याचे काम सुरू केले आणि स्वावलंबी होण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी तिच्या आईची तिला खूप मदत मिळत आहे.
advertisement
लोकल18 च्या टीमसोबत बोलताना सोनाली म्हणाली की, बॅग शिलाईचे काम सुरू करण्याआधी गावातच राहणाऱ्या नात्यातील काकूशी संपर्क केला होता. यानंतर काकूनेच मला शिलाई चालवणे शिकवले आणि कामही मिळवून दिले. मागील दोन वर्षांपासून सोनाली ही बॅग शिवण्याचे काम करत आहे. सोनालीला एका बॅगेची शिलाई केल्यानंतर 1.75 रुपये मिळतात.
सोनालीने सांगितले की, शिक्षणावर याचा परिणाम होऊ नये, यासाठी मी वेळ ठरवली आहे. शाळा आणि अभ्यास झाल्यावर मी बॅग शिवण्याचे काम करते. रोज मी 200 पिशव्या तयार करते. जे ऑर्डर देतात, त्यांचे काम पूर्ण झाल्यावर ते बॅग घेऊन जातात. तसेच जो काही खर्च आला असेल ते दिले जातात. यातून माझी कमाई होते, असे तिने सांगितले.
advertisement
400 विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये देतोय शिक्षण, राज्यपालांनीही केला सन्मान, कोण आहे हा अवलिया?
सोनालीने सांगितले की, ती दररोज 4 वाजता उठते. एक तास अभ्यास केल्यावर एक तास बॅग शिलाईचे काम करते. यानंतर कॉलेजला जायची तयारी करते. कॉलेजवरुन परतल्यावर जेवण केल्यावर काही वेळ आराम करते. यानंतर पुन्हा बॅग शिलाईचे काम करते. दिवसभरातून ती तब्बल चार तास काम करते. यातून तिला चांगला नफा मिळतो.
advertisement
जेव्हापासून मी दहावीमध्ये होती, तेव्हापासून मी हे काम करत होती. आता कॉलेजमध्ये जायला लागली. मी करत असलेल्या कामाच्या माध्यमातून शिक्षणाचा खर्च निघतो आणि घर चालवण्यासाठी मदत होत असल्याचे तिने सांगितले. शिक्षक बनायचे तिचे स्वप्न आहे. त्यासाठी आतापासून याबाबत त्याची तयारी करत आहे, असे ती म्हणाली.
view commentsLocation :
Bihar
First Published :
March 17, 2024 3:16 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
inspiring news : आर्थिक परिस्थितीसमोर न हारता जिद्दीने उभी राहिली; वाचा, तरुणीची प्रेरणादायी कहाणी


