भिंतीवरून उड्या मारत आत घुसले नराधम, मुलींनी दार बंद केलं तरी.., नर्सिंगच्या 19 विद्यार्थिनींसोबत घडला कांड
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Gondia: भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्सिंग प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या 19 विद्यार्थीनीसोबत विचित्र कांड घडला आहे.
रवी सपाटे, प्रतिनिधी गोंदिया: महाराष्ट्रामध्ये महिलांसह मुलींच्या सुरक्षिततेच्या प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना महाराष्ट्रात घडत असताना गोंदिया तालुक्यातील भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील नर्सिंग च्या प्रशिक्षणार्थी 19 विद्यार्थ्यांच्या विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.
भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्सिंग प्रशिक्षणार्थी 19 विद्यार्थीनी या प्राथमिक केंद्रामध्ये शिकाऊ म्हणून कार्यरत आहेत. गेल्या एक महिन्यापासून त्या याठिकाणी काम करत आहेत. 7 मार्चच्या रात्री या मुली आपल्या कॉटरकडे जात होत्या. यावेळी गावातील काही समाजकंटक टवाळखोर तरुण परिसरातील भिंत ओलांडून आत घुसले, त्याने संबंधित मुलींचा विनयभंग करत, त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच द्विअर्थ शब्दांचा वापर केला.
advertisement
या प्रकारानंतर पीडित मुली घाबरल्या आणि त्यांनी राहत्या क्वॉर्टरकडे धाव घेतली. या मुली क्वार्टरमध्ये जातच क्वार्टरचे दार बंद करत असताना पुन्हा क्वार्टर जवळ येऊन या मुलींवर दगडफेक केली, अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे या मुली एकदम घाबरून गेल्या आणि त्यांनी आरडाओरड केली. आरडाओरड ऐकून परिसरातील डॉक्टर, नर्सेस आणि सुरक्षा रक्षक घटनास्थळी आले. यानंतर टवाळखोर तरुणांनी तिथून पळ काढला.
advertisement
यानंतर पीडित मुलींनी आपले प्राचार्य, डॉक्टर यांच्यासह गंगाझरी पोलीस ठाण्यात जात 8 मार्चला त्या अज्ञात तरुणांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 296, 329, 351(2) दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत 3 तरुणांना ताब्यात घेतलं. एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Location :
Gondiya,Maharashtra
First Published :
March 09, 2025 8:21 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
भिंतीवरून उड्या मारत आत घुसले नराधम, मुलींनी दार बंद केलं तरी.., नर्सिंगच्या 19 विद्यार्थिनींसोबत घडला कांड