घरात कुणीच नव्हतं, तरुणानं खाल्ल्या 'त्या' 200 गोळ्या, झाला भयंकर मृत्यू

Last Updated:

Crime in Buldhana: बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने घरात कुणीही नसताना टोकाचं पाऊल उचललं आहे.

News18
News18
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने घरात कुणीही नसताना टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने तब्बल २०० गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पंचवीशीतल्या तरुणाने अशाप्रकारे आपल्या आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पवन गव्हाळे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तो बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील रहिवासी होता. घटनेच्या दिवशी त्याने घरात कुणीच नसताना रक्तदाब नियंत्रित करण्याच्या 200 गोळ्या खाल्ल्या. यानंतर त्याची प्रकृती बिघडली. ज्यावेळी त्याचे कुटुंबीय पुन्हा घरी आले, तेव्हा तरुणाची परिस्थिती पाहून त्यांच्या पायाखालची जमीन हादरली.
घरच्यांनी त्याला तातडीनं नांदुरा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान पवनने अखेचा श्वास घेतला. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पवनने इतकं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. शिवाय घटनास्थळी सुसाईड नोटही सापडली नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या का केली? याचं गूढ निर्माण झालं आहे. आत्महत्येच्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
घरात कुणीच नव्हतं, तरुणानं खाल्ल्या 'त्या' 200 गोळ्या, झाला भयंकर मृत्यू
Next Article
advertisement
Mayor Reservation List: मुंबई महापौर आरक्षण सोडतीवरून राडा,  ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आक्रमक, नेमकं कारण काय?
महापौर आरक्षण सोडतीत राडा, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आक्रमक, नेमकं कारण काय?
  • २९ महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत आज मंत्रालयात पार पडली

  • मुंबई महापालिकेच्या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

  • किशोरी पेडणेकर यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेत सरकारला धारेवर धरले

View All
advertisement