रिल्स पाहण्यासाठी ऑनलाईन आला अन् 1 कोटी गमावून बसला; राहुलसोबत नक्की काय घडलं?
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळेल, असा मजकूर त्यात होता. या मजकुरालाच बळी पडून कोहर यांची १ कोटी २० हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ठाणे : गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक (गंडा) होण्याच्या अनेक घटना घडत असताना नुकत्याच ठाण्यामधील राहुल कोहर (वय ४३, रा. घोडबंदर रोड, ठाणे) हे इन्स्टाग्रामवर सर्फिंग करीत असताना त्यांना स्टॉक ब्रोकर या नावाने जाहिरात असलेली वेबसाइट दिसली. यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळेल, असा मजकूर त्यात होता. या मजकुरालाच बळी पडून कोहर यांची १ कोटी २० हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अधिक परतावा मिळेल हा मजकूर पाहून त्याठिकाणी दिलेल्या मोबाइलवर त्यांनी संपर्क केला असता, आरोही सिन्हा या महिलेनेही त्यांना जादा परतावा कशा प्रकारे मिळेल, याची माहिती दिली. महिलेने सांगितल्याप्रमाणे लुईसवाडीत स्टॉक ब्रोकरच्या कार्यालयाशी कोहरने संपर्क केला. त्यावेळी फसवणूकदारांनी माहिती देताना वागळे इस्टेट येथील इन्फोटेक पार्कमधील नामांकित कंपनीचे अधिकृत अधिकारी आणि स्टॉक ब्रोकर असल्याचे सांगून, गुप्ता याच्यासह त्याच्या साथीदारांनी कंपनी सेबीकडे नोंदणीकृत असल्याचा दावा केला आणि कोहर यांना एका लिंकवर डिमॅट खाते उघडण्यास सांगितले.
advertisement
१५ जून २०२५ ते ११ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत यातील फलकदास गुप्ता याने कोहर यांची लुईसवाडीतील धीरज हॉटेल आणि वागळे इस्टेट परिसरातील सर्व्हिस रोडवर भेट घेतली ज्यात ९० लाख ते १.२ ० कोटी रुपयांपर्यंतच्या फसवणुकीचा समावेश आहे, जिथे आरोपींनी उच्च नफ्याचे आमिष दाखवून क्रिप्टोकरन्सी, शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकीच्या बहाण्याने अनेक लोकांची फसवणूक केली आहे.
advertisement
त्यानंतर जेव्हा राहुल कोहरने मूळ रक्कम आणि परतावा मागितला तेव्हा या भामट्यांनी टाळाटाळ करून पैसे देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी त्यांनी आरोही सिन्हा, फलकदास गुप्ता आणि गौरव शेठ या तिघांविरुद्ध ११ जानेवारी रोजी माहिती तंत्रज्ञानसह फसवणुकीचा वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
advertisement
परताव्याच्या आमिषाने केला विश्वासघात
१. ही कंपनी सेबी रजिस्टर असल्याचा दावा केल्याने त्यांचाही विश्वास बसला. यातूनच त्यांनी वेळोवेळी एक कोटी २० हजारांची ऑनलाईन गुंतवणूक केली. त्यानंतर कोहर यांच्या डिमॅट खात्यावर नफ्याची मोठी रक्कमही दिसत होती परंतु ती केवळ कृत्रिम होती.
२. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळेल, असा मजकूर त्यात होता. हा मजकूर पाहून त्याठिकाणी दिलेल्या मोबाइलवर त्यांनी संपर्क केला.
advertisement
कशी झाली फसवणूक?
कोहर हे इन्स्टाग्रामवर सर्फिंग करीत असताना त्यांना स्टॉक ब्रोकर या नावाने जाहिरात असलेली वेबसाइट दिसली. यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळेल, असा मजकूर त्यात होता. हा मजकूर पाहून त्याठिकाणी दिलेल्या मोबाइलवर त्यांनी संपर्क केला. फसवणूकदारांनी कोहर यांच्यात विश्वासार्हता निर्माण केली.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 9:42 AM IST









