मुंबईतून 4 पोरी बोलवल्या, नागपुरात बिल्डरच्या फार्म हाऊसवर रेव्ह पार्टी, नको त्या अवस्थेत आढळल्या तरुणी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नागपुरच्या कामठी परिसरातील फार्म हाऊसवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
नागपूर: नागपुरच्या कामठी परिसरातील फार्म हाऊसवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि एएचटीयू पथकाने रेव्ह पार्टीवर छापेमारी करत चौघांना अटक केली आहे. यात नागपुरातील एका बड्या बिल्डरसह काही प्रॉपर्टी डिलरचा समावेश आहे. या ठिकाणी पोलिसांना चार तरुणीही अती प्रमाणात ड्रग्जचं सेवन केलेल्या अवस्थेत आढळल्या आहे. पोलिसांनी त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले.
सुनील शंकरलाल अग्रवाल (वय ६१, रा. रामलक्ष्मी कॉलनी, कामठी), गौतम सुशील जैन (वय ५१, रा. रामदासपेठ), नीलेश बाबुलाल गडिया (वय ६१, रा. कमल पॅलेस, रामदासपेठ) आणि मितेश मोहनलाल खक्कर (वय ४८, रा. कमल पॅलेस, रामदासपेठ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. यातील एक जण बिल्डर असून सुनील आणि त्यांचे दोन मित्र प्रॉपर्टी डिलर आहेत.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील अग्रवाल याचं नागपुरातील कामठी परिसरात एस फार्म नावाचं फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर सुनीलने शनिवारी रेव्ह पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत मुंबईतून चार पोरींना बोलवण्यात आलं होतं. या ठिकाणी एमडी, हुक्का आणि मद्याचीही व्यवस्था करण्यात आली. शनिवारी रात्री उशिरा चार आरोपी आणि चार तरुणी असे आठही जण रेव्ह पार्टीत दंग झाले होते.
advertisement
दरम्यान, कामठी येथील फार्म हाऊसवर रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती नागपूर गुन्हे शाखेला मिळाली. यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त राहुल माकणीकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मध्यरात्री एक वाजता सुनील अग्रवाल याच्या फार्महाउसवर छापा टाकला. यावेळी सर्व आरोपी झिंगाट अवस्थेत आढळले. तसेच पोलिसांना घटनास्थळी १.३१ ग्रॅम एमडी, हुक्क्याचे साहित्य आणि दारूच्या बाटल्या आढळल्या. पोलिसांनी एमडी, सहा मोबाइल, दोन कारसह २६ लाखांचे साहित्य जप्त केले. चौघांविरुद्ध नवीन कामठी पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. आरोपींना एमडी ड्रग्जचा पुरवठा कुणी केला? याचा तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
May 12, 2025 8:54 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
मुंबईतून 4 पोरी बोलवल्या, नागपुरात बिल्डरच्या फार्म हाऊसवर रेव्ह पार्टी, नको त्या अवस्थेत आढळल्या तरुणी


