मुलाचं निधन झालं अन् 70 वर्षांच्या सासऱ्याचं 28 वर्षांच्या सुनेवर जडला जीव; मंदिरात जाऊन केलं लग्न
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
सासऱ्याने आपल्यापेक्षा 42 वर्षांनी लहान असलेल्या सुनेशी लग्न केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
गोरखपूर, 19 डिसेंबर : 2023 हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवसच राहिले आहेत. या वर्षीच्या काही घटना खूप चर्चेत राहिल्या. रीकॉल सीरिजअंतर्गत अशाच एका घटनेबद्दल जाणून घेऊ या. मुलाच्या मृत्यूनंतर सासऱ्याने आपल्या सुनेशी लग्न केल्याचं एक प्रकरण यंदा खूप गाजलं. या लग्नाचे फोटो व्हायरल झाले. सुनेपेक्षा सासरा 42 वर्षांनी मोठा आहे. या अनोख्या लग्नाची परिसरात चर्चा झाली. सासरा व सुनेने हे पाऊल उचलल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला; मात्र या लग्नाबाबत कोणीच पोलिसांत तक्रार दिलेली नाही. हे लग्न परस्परसंमतीने झालं. हे नेमकं प्रकरण काय?
उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमधल्या एका गावात वयाच्या 70व्या वर्षी एक सासरा आपल्या 28 वर्षांच्या सुनेच्या प्रेमात पडला. त्याने कुटुंबाची आणि समाजाची पर्वा न करता सुनेशी मंदिरात जाऊन लग्न केलं. 2023 या वर्षाच्या जानेवारी महिन्यात ही घटना घडली होती. परिसरात या लग्नाची जोरदार चर्चा झाली. सासऱ्याने आपल्यापेक्षा 42 वर्षांनी लहान असलेल्या सुनेशी लग्न केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
advertisement
सुनेशी लग्न करणाऱ्या 70 वर्षीय व्यक्तीचं नाव कैलाश यादव आहे. कैलाश यादव हे बडहलगंज पोलीस स्टेशनचे चौकीदार आहेत. त्यांच्या पत्नीचं 12 वर्षांपूर्वी निधन झालं होतं. छपिया उमराव गावातले रहिवासी कैलाश यादव यांनी आपल्या मुलाच्या पत्नीशी मंदिरात लग्न केलं. दोघांच्या या कृतीने परिसरात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
advertisement
कैलाश यादव यांच्या चार मुलांपैकी तिसर्या मुलाचा मृत्यू झाला. त्याची पत्नी विधवा झाली. त्यानंतर तिचं दुसऱ्या व्यक्तीशी लग्न लावून देण्याबद्दल चर्चा होत होती. याच दरम्यान, सासरे कैलाश यादव आपल्या सुनेच्या प्रेमात पडले. यानंतर कुटुंब आणि समाजाची पर्वा न करता त्यांनी सुनेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. सुनेनेही प्रस्ताव मान्य केला आणि दोघांनीही एका मंदिरात लग्नगाठ बांधली. दोघांनीही संमतीने लग्न केल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी कोणीही तक्रार केलेली नाही.
view commentsLocation :
Uttar Pradesh
First Published :
December 19, 2023 6:11 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
मुलाचं निधन झालं अन् 70 वर्षांच्या सासऱ्याचं 28 वर्षांच्या सुनेवर जडला जीव; मंदिरात जाऊन केलं लग्न









