crime: अशांना चौरंग शिक्षा का होऊ नये? 70 वर्षांच्या वृद्धेचा वासनेचा शिकार करण्याचा प्रयत्न, गावकऱ्यांनी तर हद्द केली!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
पीडितेनं आरडाओरडा करताच आसपासचे नागरिक जमा झाले. लोकांना पाहून आरोपी पळून जाऊ लागला; पण लोकांनी पाठलाग करून त्याला पकडलं.
भागलपूर: बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली. तिथे 70 वर्षांच्या एका वृद्ध महिलेवर एका व्यक्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेनं पंचायतीकडे याबाबत दाद मागितली असता पंचायतीने अडीच लाखांत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलेनं पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला पोलिसांनीदेखील हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला; पण नंतर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
बिहारमधल्या भागलपूर इथे एका व्यक्तीने 70 वर्षांच्या वृद्ध महिलेला वासनेची शिकार बनवण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण पंचायतीसमोर मांडलं गेलं तेव्हा पंचायतीने महिलेच्या अब्रूची बोली लावली. पंचायतीने महिलेला अडीच लाख रुपये देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला आणि संबंधित व्यक्तीला या प्रकरणातून मुक्त केलं. प्रकरण पोलिसांकडे गेल्यावर त्याचा तपास सुरू झाला.
नवगछिया इथल्या इस्माइलपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित महिलेनं पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवला आहे. पीडितेसोबत पोलीस स्टेशनला गेलेल्या तिच्या नातवानं सांगितलं, की माझी आजी दोन दिवसांपूर्वी सायंकाळी मैदानात फिरायला निघाली होती. त्यावेळी आरोपी छैला मंडलने तिला पकडून वासनेची शिकार बनवण्याचा प्रयत्न केला. पीडितेनं आरडाओरडा करताच आसपासचे नागरिक जमा झाले. लोकांना पाहून आरोपी पळून जाऊ लागला; पण लोकांनी पाठलाग करून त्याला पकडलं.
advertisement
त्यानंतर गावाचे माजी प्रमुख सुजित कुमार यांनी पंचायत बोलावली आणि वृद्ध महिलेला अडीच लाख रुपये देऊन प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकला. 'मी आरोपीला सोडणार नाही,' असं पीडित महिलेनं सागितलं. त्यानंतर तिने पोलीस कंट्रोल रूमला फोन केला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पीडितेनं पोलिसांना सांगितलं, की या प्रकरणात गावाच्या पंचायतीनं माझ्या अब्रूची बोली लावली. पोलिसांनीदेखील सुरुवातीला प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला; पण आमदार गोपाल मंडल यांनी हस्तक्षेप केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Location :
Bihar Sharif,Nalanda,Bihar
First Published :
Aug 23, 2024 10:20 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
crime: अशांना चौरंग शिक्षा का होऊ नये? 70 वर्षांच्या वृद्धेचा वासनेचा शिकार करण्याचा प्रयत्न, गावकऱ्यांनी तर हद्द केली!







