advertisement

पैशांसाठी रक्ताचं नातं विसरला, जन्मदात्या बापाला बेल्टनं मारून घेतला जीव, जळगावातील मन हेलावणारी घटना!

Last Updated:

जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगावमध्ये एका तरुणाने आपल्या जन्मदात्या वडिलांची निर्घृण हत्या केली आहे.

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगावमध्ये नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या जन्मदात्या वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं लाकडी काठी आणि बेल्टने बेदम मारहाण करत वडिलांचा जीव घेतला आहे. पोटच्या मुलाने अशाप्रकारे वडिलांची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

भिकन राणा मोरे असं हत्या झालेल्या ६८ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ते चाळीसगाव शहरातील एम.जी. नगर भागात वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा, आरोपी कल्पेश मोरे, हा गेल्या काही दिवसांपासून नवीन रिक्षा घेण्यासाठी वडिलांकडे पैशांचा तगादा लावत होता. कल्पेशला रिक्षा व्यवसायासाठी वडिलांकडून मोठी रक्कम हवी होती, मात्र घरच्या परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांमुळे वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला.
advertisement

वादाचे पर्यावसान हत्येत

घटनेच्या दिवशी पुन्हा एकदा रिक्षाच्या पैशांवरून पिता-पुत्रामध्ये जोरदार खडाजंगी झाली. वडिलांनी स्पष्टपणे पैसे देण्यास नकार दिल्याने कल्पेशचा संताप अनावर झाला. संतापाच्या भरात त्याने घरात असलेली काठी आणि कमरेचा पट्टा घेऊन आपल्या वृद्ध पित्यावर तुटून पडला. त्याने भिकन मोरे यांना इतकी बेदम मारहाण केली की ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि गंभीर जखमी झाले.
advertisement

उपचारापूर्वीच मृत्यू आणि पोलीस कारवाई

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भिकन मोरे यांना कुटुंबीयांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. या प्रकरणी मयताची पत्नी सखुबाई मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी मुलगा कल्पेश मोरे याला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पैशांसाठी रक्ताचं नातं विसरला, जन्मदात्या बापाला बेल्टनं मारून घेतला जीव, जळगावातील मन हेलावणारी घटना!
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement