केमिकल फॅक्ट्रिमध्ये भीषण आग, 7 लोक जळून खाक; उरला फक्त सांगाडा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
राजस्थानच्या Bhiwadi येथील Rajendra यांच्या केमिकल फॅक्ट्रीत ९.३० वाजता भीषण आग लागली, ७ कामगार मृत, अनेक जखमी, फटाक्यांमुळे आगीचा भडका, पोलिस चौकशी सुरू.
9.30 ची वेळ, फॅक्ट्रीमध्ये कामाची गडबड, कुणी नुकतंच येऊन थोडं कामाला लागत होतं तर काही मजूर सकाळी लवकर येऊन काम करायला लागले होते. काहींची नाश्ता करायची वेळ झाली होती. इतक्याच आगीचा लोळ उठला. त्यानंतर स्फोटाचा आवाज आला आणि आगीचा अचानक भडका उडाला. काही कळण्याच्या आत 7 लोक जळून कोळसा झाले. त्यांना स्वत:ला वाचवण्याची संधीही मिळाली नाही. तर फॅक्ट्रीत काम करणारे कामगार सैरावैरा जीव वाचवण्यासाठी पळू लागले. काही जखमी झाले.
या केमिकल फॅक्ट्रीमध्ये साधारणपणे 25 कामगार आग लागली त्यावेळी काम करत होते. या केमिकल फॅक्ट्रीतच फटाक्यांचंही काम सुरू होतं. त्यांच्यामुळेच आगीचा जास्त भडका उडाला. पोलीस जेव्हा पेट्रोलिंग करत होते तेव्हा त्यांना ही आग दिसली. त्यानंतर या आगीची माहिती अग्निशमन दलाला कळवण्यात आली. आगीनं रौद्र रुप धारण केलं आणि संपूर्ण फॅक्ट्री जळून खाक झाली.
advertisement
7 workers killed in chemical factory fire in Rajasthan's Bhiwadi town, two people trapped inside#INDvsPAK #RJ #RISERCONCERTD2 #GHDuoCuentas6 #aag #paobc #paobc pic.twitter.com/fiXJxu6fSX
— Vishal Dubey (Journalist) (@VishalD54390254) February 16, 2026
advertisement
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास दीड तासहून अधिक अवधी लागला. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन करण्यात आलं. ही आग साधारण ९.३० च्या आसपास लागल्याचं सांगितलं जात आहे. राजेंद्र नावाच्या व्यक्तीची ही फॅक्ट्री आहे. मृतदेह अत्यंत वाईट पद्धतीनं जळालेल्या अवस्थेत होते. फक्त सांगाडा शिल्लक राहिला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
advertisement
अग्निशमन दलाला फॅक्ट्रीमधून काही फटाके आणि त्याचे कागद सापडले आहेत. त्यावरुन ही आग किती भयंकर लागली असेल याचा अंदाज येऊ शकता. राजस्थानच्या भिवाडी आणि करौली परिसरात ही आग लागली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एक मजुराला रेस्क्यू केलं जात आहे. तर मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
Location :
Rajasthan
First Published :
Feb 16, 2026 12:25 PM IST










