तोंडाला रुमाल बांधून महिलेच्या घरात घुसला, भाजपच्या माजी नगरसेवकाला लोकांनी चोपलं
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात राजकीय वर्तुळाला कलंक लावणारी घटना समोर आली आहे.
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात राजकीय वर्तुळाला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. इथं एका भाजपच्या माजी नगरसेवकाला लोकांनी बेदम मारहाण केली आहे. एका महिलेच्या घरात घुसल्याच्या कारणातून ही मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.
राहुल गोठी असं मारहाण झालेल्या माजी नगरसेवकाचं नाव आहे. तो अलीकडेच काँग्रेसमधून भाजपात गेला आहे. त्याच्या महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी राहुल गोठी हा एका महिलेच्या घरात तोंडाला रुमाल बांधून घुसला होता. घरात घुसल्यानंतर त्याने एका महिलेची छेड काढली. या आरोपाखाली राहुल गोठी याला मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
advertisement
शुक्रवारी रात्री उशिरा 11 च्या सुमारास ही मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत राहुल गोठी जखमी झाला आहे. याप्रकरणी जखमी राहुल गोठी याच्याविरोधात नांदुरा पोलिसात तक्रारही देण्यात आली. मात्र गोठी विरोधात तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण जिल्हाभरात चर्चा होऊ लागली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे हे प्रकरण चांगलेच चव्हाट्यावर आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात आता पोलिसांची महत्त्वपूर्ण भूमिका असून पोलिसांनी घडलेल्या प्रकारातील सत्य समोर आणावे, अशी मागणी होऊ लागली आहे..
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
May 03, 2025 7:04 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
तोंडाला रुमाल बांधून महिलेच्या घरात घुसला, भाजपच्या माजी नगरसेवकाला लोकांनी चोपलं


