आधी अंघोळ करताना वहिनीचा काढला व्हिडिओ, नंतर विकृत कृत्य; दिराचं मर्यादा ओलांडणारं कृत्य
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एक असं प्रकरण सध्या समोर आलं आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्ही ही विचार कराल की किती ही विकृती आहे.
मुंबई : कधीकधी आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी घडतात की, त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होऊन बसतं. काही प्रकरणं तर अशी असतात जी नात्याला काळीमा फासणारी असतात. कधी सासू-जावयाचं अफेअर तर कधी दीर-वहिनीचं अफेअर... ही अशी प्रकरणं ऐकायला कधीकधी खूपच विचित्र वाटतात. पण अशा गोष्टी समाजात घडत असतात.
पण या उलट एक असं प्रकरण सध्या समोर आलं आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हीही विचार कराल की किती ही विकृती आहे.
या प्रकरणात एका भावानं आपल्या स्वत:च्या भावाच्या बायकोसोबत लज्जास्पद काम केलं. शिवाय माणुसकीला देखील काळीमा फासणारं कृत्य केलं. या घटनेत एका दिराने मर्यादा पार करत आपल्या वहिनीवरच हैवानासारखा अत्याचार केला.
advertisement
आरोपी दिराने आपल्या वहिनीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ चोरून शूट केला. त्यानंतर तो तिच्यावर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकू लागला आणि व्हिडीओ लीक करण्याची धमकी देऊ लागला. जेव्हा तिनं स्पष्ट नकार दिला, तेव्हा त्यानं एक लाख रुपयांची खंडणी मागितली.
महिलेनं हा सगळा प्रकार आपल्या नवऱ्याला सांगितला. नवऱ्यानं जेव्हा आपल्या भावाला जाब विचारायला गेला, तेव्हा दिराने आपलं रूपच बदललं. त्यानं नवरा-बायको दोघांनाही बेदम मारहाण केली.
advertisement
17 एप्रिल रोजी ही घटना घडली, जेव्हा आरोपी दीर काही नातेवाईकांबरोबर पीडितेच्या खोलीत घुसला. तिथं शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण झाली. महिलेला मारहाण करताना तिच्या कपड्यांचंही भान ठेवण्यात आलं नाही. तिच्या किंकाळ्या ऐकून नवरा धावून आला, पण त्यालाही दिराने मारहाण केली.
सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे, जेव्हा पीडित महिलेनं घरच्यांकडून मदतीची अपेक्षा केली, तेव्हा कुणीही तिच्या बाजूने उभं राहिलं नाही. उलट घरचे लोकही आरोपी दिराचं समर्थन करत होते.
advertisement
शेवटी हताश होऊन पीडित महिलेनं थेट पोलीस ठाणं गाठलं आणि सर्व घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे. हे प्रकरण आगरामधील आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2025 9:52 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
आधी अंघोळ करताना वहिनीचा काढला व्हिडिओ, नंतर विकृत कृत्य; दिराचं मर्यादा ओलांडणारं कृत्य