रेल्वे स्टेशनजवळ सापडली डेडबॉडी, पोलिसांनं वाटलं आहे भिकारी पण तपासात आला भयानक ट्विस्ट; बुलढाणा हादरलं

Last Updated:

मृतदेह हा रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या रुग्णालयाजवळील पाण्याच्या टाकीच्या मागे आढळून आला होता.

Shegaon Police Station
Shegaon Police Station
राहुल खंडारे, प्रतिनिधी
बुलढाणा : शेगाव येथील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या रुग्णालयाजवळील पाण्याच्या टाकीच्या मागे 30 एप्रिल रोजी एका अनोळखी व्यक्तीचा बेवारस मृतदेह आढळून आला होता. सदर इसम हा भिकारी असल्याचा किंवा हा इसम हा रेल्वेतून पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात असतानाच आता या व्यक्तीची ओळख पटली असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मावसभावानेच चाकूने वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
advertisement
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मृतक हा पोलीस रेकॉर्डवरील कुख्यात आरोपी होता. त्याच्या विरुद्ध जळगाव जिल्ह्यात १७ गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. रमण बापू नामदास (वय 24) असे खून झालेल्या इसमाचे नाव असून अमळनेर तालुक्यातील रहिवासी होता. तो १५ दिवसांपूर्वी शेगाव येथे आला होता. मृतकावर अनेक गुन्हे दाखल असून जेलमधून शिक्षा भोगून शेगावात पोहोचला होता. तर ३० एप्रिल रोजी त्याचा मृतदेह हा रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या रुग्णालयाजवळील पाण्याच्या टाकीच्या मागे आढळून आला होता.
advertisement

खळबळजनक सत्य समोर

याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर शवविच्छेदनाच्या अहवालानंतर या व्यक्तीचा मृत्यू आकस्मिक नसून त्याची हत्या करण्यात आल्याचे खळबळजनक सत्य समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून माहिती मिळवत याप्रकरणी मृतकाची ओळख पटवून आरोपी महेश हनुमान कांबळे (२६, रा. सरकारी फैल) यास त्याच्या राहत्या घरातून अटक केली. तर आणखी एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले. कुठलीही माहिती नसतांना शेगाव शहर पोलिसांनी या गुन्ह्याचे रहस्य उलगडल्याची माहिती खामगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक यांनी माहिती दिली.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
रेल्वे स्टेशनजवळ सापडली डेडबॉडी, पोलिसांनं वाटलं आहे भिकारी पण तपासात आला भयानक ट्विस्ट; बुलढाणा हादरलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement